श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| श्री.दत्त जयंती महोत्सव निमित्त श्री.आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहुरगड येथे राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर(बितनाळकर)बरबडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस श्री.दत्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी हा सप्ताह मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.या सप्ताहाची दैनंदिन रुपरेषा अशी की,दि.९ डिसे.२०२४ रोज सोमवार रोजी पहाटे ४ वाजता भूपाळीने प्रारंभ होईल,सकाळी ६ ते ९ नामस्मरण व ९ ते १० प्रवचन होणार आहे.त्यानंतर दुपारी ३ ते ५ पर्यंत पोथीचे पठन व संध्याकाळी ९ ते रात्री १२ पर्यंत कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे.तसेच दि.१३ डिसे.२०२४ रोज शुक्रवार रोजी म्हणजेच दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला माहूर शहरांमध्ये श्री संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
दत्त जन्मोत्सव दिनी म्हणजेच दि.१४ डिसे.२०२४ रोज शनिवार रोजी श्री.दत्त जयंती तथा गुरु महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा होईल.यावेळी ‘गुरुकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय’ तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असून दत्त जयंतीच्या दिनी ‘आमरस व पूरणपोळीचे जेवण’ प्रसाद स्वरूपात दिवसभर आलेल्या सर्व भक्तांना देण्यात येणार आहे.
तद्नंतर अंतिमतः दि.१५ डिसे.२०२४ रोजी रविवारला भव्य रक्तदान शिबीर व संध्याकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत किर्तनाने सप्ताहाची सांगता येईल.दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी श्री.आनंद दत्त धाम आश्रम व मठाधीपती राष्ट्रसंत द.भ.प.सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांनी या सोहळ्यात जास्तीत जास्त भाविक व भक्तगणांनी सहभागी होऊन श्री.दत्त भक्तीप्रसादाचा लाभ घेण्याचे सर्वांना अवाहन केले आहे.