नांदेड। अनुसुचित जाती अ ब क ड वर्गीकरण लागू करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रा रामचंद्र भरांडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसले आहेत. त्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याची बाब आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सभागृहात सभापतींच्या निदर्शनास आणून देताच सभापतींनी या प्रश्नी तात्काळ लक्ष देण्याचे आदेश शासनाला दिले.
अनुसुचित जाती अ ब क ड वर्गीकरण लागु करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकस्वराज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे यांनी विधानसभेत ही मागणी लावून धरत मातंग समाजबांधवांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत पोटतिडकीने आवाज उठवला.
तिला अकरा दिवसापासून प्राचार्य रामचंद्र मरांडे उपोषणाला बसले असतानाही एकाही अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली नाही त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत.या मागणीसाठी आझाद मैदानावर महिला संघटना आंदोलन करीत आहेत, लाखो महिला रस्त्यावर झोपल्या आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यांना प्रचंड त्रास होण्याची भीतीही आमदार हंबर्डे यांनी यावेळी व्यक्त केली.
शासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार हंबर्डे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित केलेला प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश सभापतींनी शासनाला दिले.