किनवट, परमेश्वर पेशवे| चार महिन्यापूर्वी किनवट येथील निर्भया राठोड या अल्पवयीन मुलीला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने एका नराधमाने फूस लावून पळवुन नेण्याची तक्रार पोलीस स्टेशन किनवट येथे देण्यात आली होती.


या अनुषंगाने चार महिने उलटून देखील पीडित अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आले नव्हते शेवटी सर्वसामाजीक संघटनांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पीडित मुलीचे आणि आरोपीचे शोध लावण्यात पोलिसांना यश आले. सदरील घटनेच्या अनुषंगाने आरोपी याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करा व तात्काळ अटक करा.


14 वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवून आई-वडिलांच्या स्वाधीन करा. सदरील प्रकरणात चार महिने निष्काळजी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा. पीडित कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन करा आदी मागण्या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आल्या होत्या. आंदोलनाची सुरुवात रेल्वे स्थानक किनवट येथून होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँ.अर्जुन आडे,कॉम्रेड शंकर सिडाम, कॉ.उज्वला पडलवार,कॉ जनार्दन काळे आदींनी संबोधित केले.


यावेळी पीडित मुलीच्या न्यायासाठीचे निवेदन पोलीस अधिकारी फडेकर यांनी स्वीकारले मागण्याच्या अनुषंगाने आरोपीला जेरबंद करण्यात आले असून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी मिळाल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली.आंदोलन यशस्वी करण्यासाठी बंजारा समाजाचे व न्यायप्रिय समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी श्री प्रवीण राठोड,श्री नवीन जाधव,टेकसिंग चव्हाण, दुर्गादास राठोड, प्रेमसिंग जाधव आडेलू बोनगीर, सुनीता बोनगीर, कॉ. शैलीया आडे,कॉ. नंदकुमार मोदूकवार, कॉ. मोहन जाधव, दिनेश आडे,सिताराम आडे, राम कंडले,इंदुबाई डोंगरे,निर्मला शिंगारे, आनंद आडे, अंबर चव्हाण आदी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.


