नांदेड| एशिया बुक आॅफ रेकाॅर्डने आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डने सन्मानित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठन, नागपूरच्या वतिने घेतल्या जाणार्या साहित्य संमेलनात नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्य कर्ते तथा बालरोग विशेषज्ञ डाॅ.हंसराज वैद्य यांच्या स्वलिखित आत्मचरित्र ग्रंथ प्रकाराला प्रथम राज्यिस्तरीय “सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार” प्रदान करन्यात आला. बाबूराव धनवटे सभागृृह होकार्ट हाॅस्पिटल पाठी मागे, शिवाजीनगर नागपूर येथे साहित्य संमेलनात हा शानदार कार्यक्रम दि.2/3/2025 रोजी पहिल्याच सत्रात सकाळी 10.30 वाजता संपन्न झाला.


हा पुरस्कार विशेष अतिथी मा.प्रशांत बोकारे,कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वविद्यालय तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या शुभ हस्ते आणि प्रमुख अतिथी मा.श्री.नितीन केळकर संघटण मंत्री अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश व शुभांगी इंगोले (कार्यक्रमाध्यक्ष) तथा शुभांगी भडभडे (अध्यक्ष, पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. डाॅ.हंसराज वैद्य मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मला आज चा हा पुरस्कार माझ्या साठी तिन बाबींनीं विशेष आहे.

पहिली महत्वाची बाब म्हणजे स्वा.रा.ती. विद्यापिठाचे संस्थापक कुलगुरू मा.जनार्दन वाघमारे सरांची प्रदीर्घ,सविस्तर व वाचनीय असी प्रस्तावना लाभली. दूसरी महत्वाची बाब म्हणजे एशियायी बुक आॅफ रेकाॅर्डने व इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डने सन्मानित पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान नागपूरने मराठी भाषेला आभिजात भाषा म्हणून मिळालेल्या याच वर्ष्यात माझ्या आत्मचरित्रपर गृंथ साहित्य प्रकारास प्रथम राज्यस्तरीय “सुधा कुसुम कादंबरी पुरस्कारा” साठी केलेली निवड केली.

आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे मा.प्रशांत बोकारे साहेब,कुलगुरू राष्ट्र संत तुकडोजी महाराज विश्वविद्यालय आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या हस्ते तथा मा.नितिन केळकर संघटण मंत्री अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश,शुभांगी इंगोले ,शुभांगी भडभडे यांच्या व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित साहित्यिकांच्या साक्षिने हा पुरस्कार प्रदान केला जातोय हा “दुग्द-शर्करा-वेलदोडे” योगच म्हणावा लागेल! नाही का? कार्यक्रमात डाॅ.हंसराज वैद्य यांची व आत्मचरित्र गृंथाची वाहवा केली गेली.
