नवीन नांदेड| सिडको लातूर फाटा येथील नियोजित पुर्णाकृती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व स्मारकाचे बांधकाम तात्काळ चालू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समिती पदाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर रोड नविन नांदेड येथील नियोजित पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले, प्रशासनाला पुढील 15 दिवसाचा अल्टिमेट देऊन या प्रकरणी कार्यवाही नाहीं झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती च्या वतीने देण्यात आला.
या वेळी संस्थापक अध्यक्ष मोतीराम गजभारे, भंते संघ प्रिय, विठ्ठल गायकवाड,अमृत नरंगलकर, सखाराम शितले,दत्ता हनवते, साहेबराव भंडारे,अनिल बेरजे, स्वयंदिप वसरणीकर,बालाजी भोकरे, राघोजी वाघमारे, गौतम डूमने, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.