हिमायतनगर । तालुक्यातील कामारी येथून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी एकावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील मिनी बाजारपेठ असलेल्या कामारी गावातील एका अल्पवयीन मुलीस एकाने फूस लावून पळवून नेले. हि घटना दि. २७ रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली आहे. फिर्यादी विठ्ठल देवराव शिरफूले वय ५२ वर्ष रा. कामारी यांच्या फिर्यादीवरून आरोपी साहिल बेग गफार बेग वय १७ वर्ष ८ महिणे याचेवर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुरन. २८४/ २०२४ कलम ३३७ ( २ ) बी.एन. एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलगी व आरोपी हे बाल विधी संघर्ष आहेत. आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे हे अधिक तपास करीत आहेत.