हिमायतनगर, अनिल मादसवार| हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात यंदा मतांची टक्केवारी वाढल्याने महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशी चर्चा सर्वत्र असताना कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेक नेरेटिव्ह पसरवून निकालात संभ्रम निर्मण करण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्वच फेरीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर यांच्या मतांची आकडेवाडी वाढतच गेल्याने शेवटी बाबूराव कदम यांचा विक्रमी मतांनी म्हणजेच 30 हजार 228 मतांनी विजय झाला. बाबुरावजी कदम याना निवडून आणण्यासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी घेतलेली मेहनत फळाला आली असल्याने ते विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर कोण..? निवडून येणार याबाबत चौका चौकात चर्चा सुरू होत्या. तर अनेक कार्यकर्त्यांनी शर्यती लावून जय पराजयावर भाष्य केले होते. दरम्यान दिनांक २३ रोजी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुपारच्या वेळी निकालाच्या अंतिम फेरीपर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर फेक निगेटिव्ह पसरवून जनमानसात संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांना पुरून उरत शेवटच्या फेरीपर्यंत बाबुराव कदम कोहळीकर यांची लीड कटलीच नाही. त्यामुळे बाबुराव कदम यांचा 30 हजार 228 मताच्या फरकाने दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या विजयाची माहिती मिळताच हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात फटाक्याची अतिशबाजारी व जल्लोष साजरा करण्यात आला. या निवडणुकीत बाबुराव कदम यांना 1 लक्ष 12 हजार 531 मते मिळाली, माधवराव पाटील यांना 82 हजार 303 मते मिळाली तर दिलीप राठोड यांना 11 हजार 337 मते मिळाली आहेत.
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरापासून फटाक्याची आतिशबाजी करत शहराच्या मुख्य रस्त्याने विजयी जल्लोष मिरवणूक काढली होती. तत्पूर्वी 12 वाजता महाराष्ट्रात महायुती सरकारची आघाडी आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत ठिकठिकाणी व्यापारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवीत जल्लोष साजरा केला तसेच येथील भाजप शिवसेना महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीत आला बाबूराव…. आता आला बाबुराव…. या नावाचा एकच जयघोष सुरू होता.
काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आणि बाबुराव कदम कोहळीकर यांचे छायाचित्र हातात धरून युवकांनी डीजेच्या तालावर ठेका धरून विजयाचा आनंद उत्सव साजरा केला. तर अनेकांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढा भरवत जिलेबी खाऊ घालून आनंद साजरा करत विजय यांच्या शुभेच्छा दिल्या. एकूणच मागील निवडणुकीमध्ये तीनदा पराभव पत्करल्यानंतरही हार न मानता बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपले समाज कार्य चालू ठेवले होते. याचाच फायदा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविण्यासाठी झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा आशीर्वाद, महायुतीने सरकारने केलेल्या विविध विकास कामावर प्रभावित होऊन आणि काँग्रेसचे लाडक्या बहीण योजनेला केलेला विरोध लक्षात घेऊन भरपूर मतदान झाल्याने बाबुराव कदम कोहळीकर यांचा विजय झाला तर या विजयामध्ये हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे ठरले असल्याचेही एकच चर्चा सर्वत्र होत होती.
हिमायतनगर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी देखील बाबुराव कोहळीकर यांच्या विजयामध्ये मोठा सहभाग घेतला असून, निवडणूक पूर्वी मुस्लिम समाज बांधवांनी बाबुराव कदम कोहळीकर यांना पाठिंबा देऊन डोअर टू डोअर प्रचार केल्यामुळे हिमायतनगर शहरातून मताची आघाडी मिळाली असल्याचेही बोलले जात आहे, बाबुराव कदम कोहळीकर यांचा विजय झाल्याचे समजताच बाजार चौकात असलेल्या मोहम्मद जाविद भाई, कंपनी यांच्या कार्यालयासमोर समाज बांधवांनी डीजे लाऊन जल्लोष साजरा केला आहे.