नांदेड| निवडणूक हा लोकाशाहीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. भारतीय संविधानाने दिलेला मताधिकार निवडणुकीत वापरून लोकशाही बळकट केली पाहिजे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी मतदान आवश्यकच असल्याचे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. ते शहरातील खडकपुरा परिसरात ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथवाचन समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी भदंत शिलरत्न थेरो, सामाजिक कार्यकर्ते भगवान येवले, लाॅर्ड बुद्धा टीव्ही प्रतिनिधी सदाशिव गच्चे, हिरामण पंडित, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, ग्रंथवाचक अनिल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उपासक प्रकाश मस्के हे होते.
शहरातील वजिराबाद खडकपूरा परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण सोसायटीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन समारोप सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपासकांच्या याचनेवरुन भदंत शिलरत्न थेरो यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. मान्यवरांच्या सत्कारानंतर या कार्यक्रमात बोलताना सदाशिव गच्चे म्हणाले की, आजही बौद्ध समाजात बावीस प्रतिज्ञा काटेकोरपणे अंगिकारण्याची गरज आहे. बौद्ध हे कपड्यांवरून नव्हे तर वर्तनाद्वारे ओळखले गेले पाहिजेत असे ते म्हणाले. यावेळी भदंत शिलरत्न थेरो यांचीही धम्मदेसना संपन्न झाली. तसेच भगवान येवले आणि संघमित्रा पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, प्रकाश मस्के यांचा सेवानिवृत्तीबद्दल सप्त्निक सत्कार करण्यात आला. तसेच ग्रंथवाचक अनिल थोरात यांना कपडेरुपी आहेर देऊन त्यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल थोरात यांनी केले. तर आभार महिला मंडळाच्या वतीने मानण्यात आले. सुधाकर सिरसाठ, देविदास गोडबोले, हिरामण पंडित, माजी सैनिक सूनील पंडित, विश्वनाथ पंडित, आकाश सोनुले, प्रतिक सिरसाठ, सुमेध सिरसाठ, नारायण सोनुले, सतिश आमदे, सिद्धार्थ मस्के, मोतिराम मस्के, वंदना गोडबोले, कुंता वाघमारे, वनिता सिरसाठ, छाया आमदे, छाया मस्के, लक्ष्मीबाई पंडित, संघमित्रा पंडित, पंचशिला सिरसाठ, रुक्मिणीबाई वाघमारे, भाग्यश्री सिरसाठ, पुजा वाघमारे, सखुबाई पंडित, भारतबाई मस्के, वंदना थोरात, सुमनबाई सोनुले, राधाबाई हाटकर, संघमित्रा आठवले, आशा गच्चे, गिताबाई बनसोडे, राधाबाई अन्नपूर्णे यांनी परिश्रम घेतले. आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.