नांदेड| राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक मोलीके यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2024-25 चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात आले आहे.
• पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका व पर्यवेक्षिका).
• प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक).
• माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक).
• विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट.
• अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता).
ही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात वरील गट क्र. 1 ते 3 साठी जिल्हास्तरावर व गट क्र. 435 साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा ही सन 2024-25 साठी मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातून शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धांचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. त्याचा तपशील, कालावधी-दिनांक व स्वरूप असे राहील. जिल्हा समन्वयक यांची मार्गदर्शन बैठक 4 नोव्हेंबर 2024 रोजी ऑनलाईन स्वरुपात राहील. नवोपक्रम नोंदणी 4 ते 20 नोव्हेंबर कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाईन पोर्टलवर सादर करणे. छाननी (पात्र/अपात्र) 21 ते 27 नोव्हेंबर कालावधीत ऑनलाईन राहील.
टप्पा क्र. 2 चे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल. जिल्हास्तर गट 1 ते 3 पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण 9 ते 20 डिसेंबर कालावधीत ऑनलाईन स्वरुपात असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे आयोजक असतील. दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण 13 ते 31 डिसेंबर कालावधीत ऑनलाईन स्वरुपात असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे आयोजक असतील. विभागस्तर गट 4 ते 5 पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण 16 ते 27 डिसेंबर कालावधीत असून ऑनलाईन स्वरुपात प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे आयोजक असतील.
दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण 1 ते 9 जानेवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात असून प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे आयोजक असतील. राज्यस्तर गट 1 ते 5 पहिली फेरी ऑनलाईन अहवाल परीक्षण 15 ते 31 जानेवारी 2025 कालावधीत ऑनलाइन स्वरुपात असून क संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे आयोजक असतील. तर दुसरी फेरी ऑफलाईन सादरीकरण 3 ते 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत असून क संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे आयोजक असतील, अशी माहिती नांदेडचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुदर्शन चिटकुलवार यांनी दिली आहे.