नांदेड| येथील अणाभाऊ साठे चौक परिसरातील सम्राटनगरस्थित नवजात शिशु अत्याधुनिक अतिदक्षता हॉस्पीटल असलेल्या हायटेक हॉस्पिटल येथे मागील ९ वर्षाच्या वाटचालीत दुसऱ्यांदा मेडीकल मिरॅकल करत अवघ्या ६४० ग्रॅम वजनाच्या बाळाला सलग ५५ दिवसांच्या अद्ययावत वातानुकुलीत अतिदक्षता नवजात शिशु विभाग व अतिउच्च दर्जाची कृत्रीम श्वसन यंत्रणा यासह विविध प्रकारच्या लाईफ सर्पोर्ट सिस्टिमचा एकत्रित आणि नियंत्रित उपयोग करत यशस्वी जिवनदान देण्याची किमया साधली आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी हायटेक हॉस्पिटल येथे बाजूलाच असलेल्या अंकुर वुमेन्स हॉस्पिटल येथील 33 आठवडयाचे हे बाळ पालकांच्या सल्लामसलतीनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले यानंतर येथील तज्ञ व नवजात शिशुचे स्पेशालिस्ट डॉ. संतोष के. बोमनाळे ,डॉ. सुचिता एन. भुरे ,डॉ. अजितसिंह बैस ,डॉ. उद्धव एम. वडजे (पा.) डॉ. नागेश पांडागळे, यांच्यासह हायटेक च्या संपूर्ण टिमने यशस्वीपणे सलग ५५ दिवस या बाळावर उपचार करत दि.१३ डिसेंबर रोजी यशस्वी डिस्चार्ज देण्यात आला त्यावेळी बाळाचे वजन हे १६०० ग्रॅम ईतके व सर्व अवयव हे सुस्थितीत कार्यरत असल्याची माहीती पत्रकारांशी संवाद साधतांना देण्यात आली.
यावेळी पुढे सांगताना हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले की , बाळाच्या निरोगी आयुष्याचे आमचे सदैव अथक प्रयत्न कामी आल्याचे समाधान असून , आजघडीला प्रिमॅच्युअर बेबी जन्माचे प्रमाण हे वाढले
असून त्यामुळे नवजात शिशु अत्याधुनिक अतिदक्षता हॉस्पीटल ची गरज दिवसेंदिवस वाढत आहे त्याच धर्तीवर आपण हैदराबाद,पुणे,मुंबई आदी मोठ्या शहरातील बहतांश सोयी-सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत या कारणाने मोठ्या शहरात जाऊन आपल्या भागातील रुग्णांचा होणारा नाहक खर्च व वेळ या दोन्ही बाबींची बचत होत असून हैदराबादच्या तुलनेत खूप कमी खर्चात याठिकाणी उपचार करणे शक्य आहे.
या केसमध्ये सदरील पालकांना तब्बल २० वर्षानंतर बाळ होत होते परंतु हा गर्भ जुळ्या बाळांचा होता त्यामुळे आम्ही याबाबतीत प्रत्येक घडामोडीवर अगदी बारकाईने लक्ष देऊन होतो. परंतु अचानकपणे ६ महीन्यानंतर गर्भाशयातील एका बाळाची वाढ खुंटली ही बाब आम्ही वेळीच हेरून दर आठवड्याला यशस्वीपणे कृत्रिम उपचार करत तो गर्भ ८ महीन्यांपर्यंत नेत आईला होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी ३३ आठवड्यात दोन्ही बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेतला. अशी माहीती अंकुर चे स्त्रिरोग तज्ञ डॉ. नामेदव भुरे यांनी यावेळी दिली. पत्ता: हाय-टेक हॉस्पीटल 49 “बोमनाळे हाईट्स” नांदेड टाऊन मार्केट. सोसायटी, सम्राट नगर, अण्णाभाऊ साठे चौक, नांदेड. फोन : 7722021122