हदगाव, गजानन जिदेवार। रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची हदगाव तालुका कार्यकारिणी विशेष बैठक मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी हदगाव जि.नांदेड येथे दुपारी २वा . जेष्ठ स्वस्त धान्य विक्रेते चंपतराव भगाजीराव कवळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस प्रमुख पाहुणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके, कार्याध्यक्ष अब्दुल सलिम अ.मुनिर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अनिल कुलकर्णी, राज्यसहसचिव शाहुराज गायकवाड प्रमुख मार्गदर्शक नेते श्रीनिवास दमकोंडवार , संघटनेचे तालुका नेते शेषराव कदम पाटील उपस्थित होते.
या बैठकीस यादव मिराशे,जयप्रकाश देशमुख,शेख अतिक,मल्लिकार्जुन मुखेडी,दादाराव महाजन , गणपत बास्टेवाड,रामराव , केरई, कमलबाई साखरे ,कैलास देशमुख (सुर्यवंशी), सचिन भाले, पांडुरंग तेलुरे,मारोतराव सोनाळे , पांडूरंग तरटे , मारोती चेपुरवार उपस्थित होते. या बैठकीत एकमताने रास्तभाव धान्य दुकानदार संघटना ता.हदगाव जि.नांदेड ची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या बैठकीत शेषराव कदम पाटील यांच्या संघटनेतील कार्याची दखल घेऊन रास्त भाव धान्य दुकानदार संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून नुतन हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून चंपतराव भगाजीराव कवळे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
तर तालुका उपाध्यक्ष म्हणून जयप्रकाश देशमुख व तालुका सचिव म्हणून मिलींद खंदारे हेच पूर्ववत कार्यरत आहेत. कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी यांचे स्वस्त धान्य दुकानदार व जनतेतून स्वागत होत आहे. सर्व सामान्य ग्राहक नागरिकांना समाधान कारक सेवा देण्यासाठीच संघटना कार्यरत राहिल. त्याचबरोबर सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या अडी आडचणी समस्या सोडविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्य करील असे आश्वासन नुतन अध्यक्ष कवळे पाटील यांनी दिले. नुतन पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे तालुका सरचिटणीस मिलिंद खंदारे व उपाध्यक्ष जयप्रकाश देशमुख यांनी कळविले आहे.