नविन नांदेड। अ.भा.अंनिस च्या ४० व्या वर्धापन दिन व संत गाडगेबाबा यांच्या स्मृती दिनाच्या निमिताने अभिवादन कार्यक्रम कालवश रावसाहेब सूर्यकार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र , डॉ. अण्णा भाऊ साठे चौक, चंदासिंग कॉर्नर तुप्पा,नांदेड येथे घेण्यात आला.
यावेळी जिल्हा संघटक प्रा.इरवंत रा. सूर्यकार, जिल्हा सचिव श्री.अंबादास भंडारे, शहर संघटक श्री. बालाजी पाटोळे, श्री. विलास वाघमारे, नांदेड तालुका युवा संघटक श्री. बालाजी थोटवे, सदस्य शिवराज आप्पा वानोळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा संघटक प्रा.सूर्यकार यांनी आपले विचार मांडले अ.भा.अनिस ४० व्या वर्षे पूर्ती च्या संदर्भात अ.भा.अनिस ची वाटचाल त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रा.श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेलं काम समाजामध्ये विवेकवादी विचार आणि वैज्ञानिक दृषीकोन रुजवीने वाईट प्रथे विरोधात आवाज बुलंद करित आहोत.
त्यासाठी राज्य संघटक प्रा.हरिभाऊ पाथोडे ,राज्य महिला संघटिका श्रीमती छायाताई सावरकर,राज्य युवा संघटक श्री.पंकज वंजारे यांनी आपर मेहनत घेत आहेत,संत गाडगेबाबा यांनी आपल्या वाणीतून आयुष्यभर समाजिक परिवर्तन करण्यासाठी देह झिजवीला अश्या थोर महात्म्याच्या कार्यकर्तृवास भावपूर्ण अभिवादन केल.