नायगांव, रामप्रसाद चन्नावार। मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी श्री सुनीलचंद्र वाघमारे व सचिव पदी श्री कानिप अन्नपूर्णे यांची एकमताने निवड करण्यात आली.
मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव श्री बालाजी सूर्यवंशी यांनी ही निवड जेष्ठ पत्रकार श्री प्रमोद माने यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केली. परिषदेचे राष्ट्रीय नेते श्री. एस. एम. देशमुख यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली. ही निवड दोन वर्षासाठी असेल.
या निवडीचे एस. एम. देशमुख विश्वस्त किरण नाईक व परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी स्वागत केले. या प्रसंगी पत्रकार महादेव जामनिक, ब्रह्मानंद चक्करवार यांची उपस्थिती होती. या कार्यकारिणीत ग्रामीण भागातील पत्रकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.