इटावा, सिकंदराबाद, भुसावल आणि नाशिक संघाची विजयी सलामी -NNL

    0

    नांदेड, रविंद्रसिंघ मोदी। गुरुवार, दि. 22 रोजी येथील खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम येथे सुरु झालेल्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या पहिल्या दिवशी साखळी सामन्यात सैफई हॉस्टल इटावा, आर्टलेरी सेंटर सिकंदराबाद, भुसावल रेलवे बॉइज आणि आर्टलेरी सेंटर नाशिक संघांनी पहिले सामने जिंकत विजयी सलामी दिली आहे. तर डेक्कन हैदराबाद, नांदेड आणि पुणे संघांना मात्र पराजयास सामोरे जावे लागले.

    आज दुपारी स्पर्धेचे उदघाटन होऊन पहिला सामना सैफई हॉस्टल इटावा संघ आणि डेक्कन हैदराबाद संघा दरम्यान खेलविण्यात आला. बलाढ्य डेक्कन हैदराबाद संघाने खेळाच्या 37 मिनिटास मोहम्मद अफान खान यांच्या मैदानी गोलाने आघाडी घेतली. पण इटावा संघाने खेळाच्या 57 आणि 59 व्या मिनिटास लगोपाठ दोन गोल करून खेळात वर्चस्व निर्माण केले. विजय मिळवतांना फवाद खान आणि रजा खान यांनी आपल्या संघासाठी एक – एक गोल केले.

    आजचा दूसरा सामना आर्टलेरी सिकंदराबाद आणि खालसा यूथ क्लब नांदेड संघात खेळला गेला. सिकंदराबाद संघाने 4 विरुद्ध 2 फरकाने नांदेड संघाचा पराभव केला. सिकंदराबाद तर्फे मल्हारी चव्हाण 9 व्या आणि 43 व्या मिनिटास तसेच भानुप्रकाश याने 45 व 51 व्या मिनिटास गोल केले. दूसरीकडे खालसा यूथ क्लब नांदेड तर्फे साईनाथ पिनापल्ले याने खेळाच्या 50 व्या आणि 60 व्या मिनिटास गोल केले.

    तिसऱ्या सामन्यात भुसावल रेलवे बॉइज संघाने 2 विरुद्ध 0 फरकाने साईं एक्सेलेंसी औरंगाबाद संघाचा पराभव केला. भुसावल संघा तर्फे खेळाच्या 14 व्या मिनिटास समीर बेग याने तर 46 व्या मिनिटास खालिद अहमद याने मैदानी गोल केले. औरंगाबाद संघास शेवट पर्यंत गोल करता आले नाही.
    आजचा 4 आणि शेवटचा सामना आर्टलेरी सेंटर नाशिक आणि एक्सेलेंसी हॉकी अकादमी पुणे संघ यांच्यात झाला.

    संघर्षपूर्ण सामन्यात नाशिक संघ विजयी ठरला. नाशिक संघातर्फे लालप्रीत सिंघ यांने खेळाच्या 10 व्या मिनिटास आणि चरणजीतसिंघ याने 59 व्या मिनिटाला गोल केले. आजच्या सामन्यात हॉकी इंडियाचे निष्पक्ष पंचानी सामन्यात पंचगिरि केली. रमीज कुरैशी, अय्याज हनीफ, अरुण दीनानाथ सिंघ, इंदरपालसिंघ, रोहन जवाले, उमेश भिडे, जीशान शेख, धीरज पृथ्वीराज चव्हाण यांनी कामगिरी केली. सोनू कुमार यांनी सहकार्य केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here