नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय सिडको नांदेड या शाळेत जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील,तर प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षिका सौ.के. पी.पल्लेवाड,सौ.एस.आर बीरगे,
बी.जी.हंबर्डे, ए.के.जांबकर, सौ.व्ही.यु.भाले, एस.ए.कोरडे,ए.डी. मोरे, जी.ए.जाधव, एन.पी.जाधव व डी.जी. पवार उपस्थित होते,यावेळी विद्यार्थ्यांनी विवीध हिंदी गीत सादर केले.
त्यानंतर सहशिक्षक बी.जी.हंबर्डे यांनी हिंदी विषयाचे महत्व विशद करतांना सांगीतले की भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदी आहे. १० जानेवारीला देशभरात हिंदी दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारताशिवाय जगात असे अनेक देश आहेत जिथे हिंदी भाषिक लोक आहेत. हिंदी ही भारतातील एकमेव भाषा आहे जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि ईशान्येपासून गुजरातपर्यंत बोलली जाते. हिंदी ही एक भाषा आहे जी जगभरात मोठ्या प्रमाणावर बोलली जाते.
एस.आर.बीरगे यांनी सांगितले की जागतिक हिंदी दिवस दरवर्षी १० जानेवारी रोजी साजरा केला जातो. हिंदी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून जागतिक स्तरावर मांडणे आणि तिच्या संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे हा तिचा उद्देश आहे. हिंदी भाषा आणि हिंदी साहित्याचा जगभरात प्रसार करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हिंदी दिवस हा सण म्हणून साजरा केला जातो.
सौ. व्ही. यु.भाले यांनी सांगीतले की २००६ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी दरवर्षी १० जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती.
१० जानेवारी १९४९ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पहिल्यांदा हिंदी भाषेचा वापर करण्यात आला. १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हिंदी भाषेला देशाच्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता. हिंदी ही देशाच्या बहुतांश भागात बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे हिंदी ही राजभाषा करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी शंकर कापसे यांनी सफदर हाश्मी यांची’किताबे कुछ कहना चाहती है’ ही कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.पी. जाधव यांनी केले तर आभार बी. बी. पाटोळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीते साठी शंकर कापसे व गजानन सुरेवाड यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती.