हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र केवळ फोटो सेशन पुरते राजकीय नेते काम करत असल्याने गतवर्षीच्या पिकविम्याच्या नुकसान भरपाईसह यंदाच्या अतिवृष्टीच्या मदतीपासून नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहतात कि काय..? असे साध्यतंरी दिसून येत आहे. पुरग्रस्त शेतक-याच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची तत्परता का..? दिसुन येत नाही असे खडेबोल शेतकरी बोलून दाखवीत आहेत.
हदगाव विधानसभा क्षेञात २०१९ च्या दरम्यान अशीच अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी हिगोली लोकसभाचे सेनेचे खा.हेमत पाटील यांनी हदगाव हिमायनगर तालुक्यात धावती भेट दिली. आणि तात्काळ पुरग्रस्त भागातील नागरिकांना व ञस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देवून हदगाव शहरातील तहसिल कार्यालयात ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार दोन्ही तालुक्यातील सर्व संबधित कर्मचारी प्रमुख अधिकारी, पत्रकार यांची अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तातडीची विशेष बैठक घेतली. आणि पुरग्रस्त नागरिक शेतकरी यांचेशी थेट भेट करुन पीक नुकसान बाबतीतच्या आकडेवारी बाबतीत स्पष्ट सुचना त्यांनी दिल्या होत्या.
सत्य परिस्थिती नमुद करण्यासंबधी पुरग्रस्त कुणावरही अन्याय होणार नाही. यांची तसदी घ्या व ताबडतोब पुरग्रस्त शेतक-याचा अहवाल शासनाकडे पाठवा अश्या सक्त सुचना त्यावेळी दिल्या होत्या. इतकेच नव्हे तर जिल्हाआधिकारी विभागीय आयुक्त सह थेट मुबईला त्यांनी हदगाव विधासभा क्षेञात अतिवृष्टीने झालेल्या पीकाच्या नुकसान बाबतीत माहीती दिली होती. त्यावेळी स्थानिय प्रशासकीय यंञणा पण जोमाने कामाला लागली होती. परिणामस्वरुप त्यावेळी शेतक-यांना काही महीण्यातच शासकीय अनुदान शेतक-याच्या खात्यात जमा झाले होते. परंतु त्यानंतर अशी परिस्थिती कोणत्याही लोकप्रतिनिधी कडुन पाहायावस मिळाली नाही. अस शेतक-याच्या बोलण्यातुन सध्याची परिस्थिती पाहता दिसुन येत आहे.