नांदेडमहाराष्ट्र

क्‍युआर कोडव्‍दारे हजेरी न देणा-या कर्मचा-यांची व्हिडीओ कॉलव्‍दारे पडताळणी: मुख्‍य कार्यकारी अधिकारी करणार कारवाई – NNL

नांदेड| ग्रामीण भागातील कर्मचा-यांच्‍या उपस्थितीसाठी जिल्‍हा परिषदेने शाळा, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, ग्राम पंचायत आदी ठिकाणी क्‍युआर कोड लावले आहेत. परंतू काही कर्मचारी या नवीन प्रणालीचा वापर करण्यास नकार देत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या शाळा, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, ग्रामपंचायत आदी कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी थेट व्हिडिओ कॉलकरुन पडताळणी करणार आहेत. दरम्‍यान कार्यालयाची वेळ व शिस्‍त न पाळणा-या व गैरहजर असणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उचलण्‍यात येणार असल्‍याची माहिती मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे.

20x10

ग्रामीण व दुर्गम भगात कर्मचारी गावात वेळेवर उपस्थित राहत नाहीत. काही वेळा अनुपस्थित राहतात अशा तक्रारी वारंवार जिल्‍हा परिषदेला येत होत्‍या. त्‍या अनुषंगाने ग्राम पातळीवरील कर्मचारी गावात वेळेत उपस्थित राहून आपले कर्तव्‍य बजवावे यासाठी गाव पातळीवर मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्‍या संकल्‍पनेतून कर्मचा-यांच्‍या उपस्थितीसाठी क्‍युआर कोड बसविण्‍यात आले. याव्‍दारे कर्मचा-यांची उपस्थिती थेट जिल्‍हा परिषदेत कळणार होती. बहुतांश शिक्षक, आरोग्‍य कर्मचारी, ग्रामसेवक आदी कर्मचारी या प्रणालीचा विरोध करत आहेत. ही प्रणाली नको असल्‍याचे अनेक संघटनेने जिल्‍हा परिषदेकडे निवेदन देखील दिले आहेत. पंरतु नागरिकांच्‍या सेवेसाठी आपली नोकरी असून ती आपण स्‍वीकारली आहे. त्‍याचा आपल्‍याला पगार देखील मिळातो. त्‍यासाठी कर्मचा-यांनी प्रत्‍यक्ष कर्तव्‍यावर राहून काम करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठीच क्‍युआर कोडप्रणाली गाव स्‍तरावर लावण्‍यात आली आहे.

Chidrawar

अनेक कर्मचारी क्‍युआर कोड या प्रणालीला विरोध करत असल्‍यामुळे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या शिक्षकांसह इतर कर्मचारी कार्यालयात कर्तव्‍यावर आहेत किंवा नाही याची व्हिडीओ कॉलव्‍दारे पडताळणी करणार आहेत. प्राथमिक आरोग्‍य केंद्र व उप केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्‍यांच्‍या सकाळच्‍या किंवा रात्रीच्‍या डयुटी वेळापत्रकानुसार उपस्थित आहेत का याची खात्री मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या व्हिडीओ कॉलव्‍दारे करणार आहेत.

Saai

नंदगाव येथे व्हिडीओ कॉलव्‍दारे सीईंओनी केली पडताळणी
क्‍युआर कोडव्‍दारे हजेरी न देणा-या कर्मचा-यांची व्हिडीओ कॉलव्‍दारे पडताळणी करण्‍याच्‍या मोहिमेला आजपासूनच मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सुरवात केली आहे. आज त्‍यांनी किनवट तालुक्‍यातील नंदगाव येथील जिल्‍हा परिषद शाळेतील मुख्‍याद्यापकांना व्हिडीओ कॉल करुन शिक्षक उपस्थित आहेत का याची पडताळणी केली. नंदगाव येथील जिल्‍हा परिषद शाळेत पाच शिक्षक कार्यरत आहेत. ज्‍यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्हिडीओ कॉल केला तेव्‍हा सर्वच्‍या सर्व शिक्षक शाळेत उपस्थित होते. यावेळी त्‍यांनी शिक्षकांशी संवाद साधला. आता वेगवेळया ठिकाणच्‍या शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाडी आदी कार्यालयात मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल ह्या व्हिडीओ कॉल करुन कर्मचा-यांच्‍या उपस्थितीची पतडताळणी करणार आहेत. दरम्‍यान कार्यालयात कर्मचारी हजर नसेल तर त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

nnlmarathi.com

Is Most Popular Marathi News Website from Nanded (India). We not only break news या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि लेखक, वार्ताहर, पत्रकार, संबंधित जाहिरातदारांची आहे. यास NNLMARATHIन्यूजचे प्रकाशक, संचालक/संपादक, मालक यांची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती, मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. यावरून काही वाद-विवाद निर्माण झाल्यास ते हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!