नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील सार्वजनिक बांधकाम विगाग कार्यालयानजीक शासकीय विश्रामगृहा जवळ विना परवाना दोन जनावरांना घेवून वाहतूक करताना टाटा मॅजिक गाडी पोलीसांनी पकडली. हि कारवाई दि. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील किनवट, नांदेड राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, शासकीय विश्रामगृहासमोर एक टाटा मॅजिक गाडी एम. एच. २६ बी. ई. ८३७९ किंमत ४ लक्ष रूपयांच्या गाडी मध्ये दोन जनावरे अतिशय क्रूरपणे, त्यांच्या जीवितास इजा पोहचण्याचा इराद्याने व तसेच कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पोलीसांनी पकडले. हि कारवाई सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान करण्यात आली असून दोन जनावरे किंमत १६ हजार वाहनाची किंमत ४ लाख रूपये असा एकूण ४ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल हरिदास भगत यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुरन. २०३/२०२४ कलम ५ ( अ ), ( बी ) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यासह कलम ११ ( १ ) ( ड ) प्राण्यांचा छळ प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला सहाय्यक उपनिरीक्षक श्रीमती कोमल कागणे ह्या करीत आहेत.