उस्माननगर | महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल दिनाचे औचित्य साधून कंधार महसूल उपविभागातील अव्वल कारकून अविनाश शंकरराव पानपट्टे यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट आणि प्रशंसनीय कार्याची महाराष्ट्र महसूल विभागाने दखल घेऊन महसूल दिनी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय , कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.


यावेळी विभागीय पोलिस महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप , निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर , कंधार उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार , यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अव्वल कारकून अविनाश शंकरराव पानपट्टे यांचा यथोचित सन्मान करून सत्कार केला. पानपट्टे यांना सन्मान व गौरव पत्र मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख जयवंतराव काळे ( बिलोली जि.प.के.प्रा ) , व काळे परिवार आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे

