नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शेतीनिष्ठ शेतकरी कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना ‘जीवन-साधना गौरव’ (The University honored all the farmers) पुरस्काराने सन्मानित करून समस्त शेतकऱ्यांचा आणि शेतात कष्ट करणाऱ्यांचा सन्मान केला आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे सहकार विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री मा.ना. बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आज दि.३० जानेवारी रोजी सन २०२३-२४ वर्षासाठीचे पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील झरी येथील सूर्यकांतराव देशमुख यांना मान्यवरांच्या हस्ते ‘जीवन साधना गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप शाल, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र व २५ हजार रुपये रकमेचा धनादेश असा आहे.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, मनपा आयुक्त गणेश देशमुख,कृषी भूषण सूर्यकांतराव देशमुख, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एम. मोरे, इंजि. नारायण चौधरी, हनमंत कंधारकर, डॉ. सुरेखा भोसले, अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, डॉ. पराग खडके, डॉ. डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डी. एम. खंदारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी मोहमद शकील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती.

पुढे बाबासाहेब म्हणाले, सूर्यकांत देशमुख यांनी परभणी जिल्ह्यातील झरी येथे एक आदर्श निर्माण केलेला आहे. सर्व जाती धर्मामध्ये एकोपा घडविला आहे. एक-गाव-एक-स्मशानभूमीद्वारे सर्व जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण केला आहे. आज भारतात तीस कोटी लोकसंख्या सहकार चळवळीशी जोडली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचे सहकार चळवळीचे पुर्नजीवन करायचे आहे. यामुळे ग्रामीण भागातील खरी प्रगती सहकारातून होते. विषमुक्त अन्नाची आज आपल्याला गरज आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. शेवटी त्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे विद्यापीठाला सर्वोपतरी मदत करण्याची ग्वाही दिली.

सत्काराला उत्तर देताना कांतराव काका देशमुख म्हणाले २० हजार लोक वस्तीच्या झरी गावामध्ये पूर्वी २० स्मशानभूमी होत्या. आता एकच आहे. एक-गाव एक-स्मशानभूमी प्रत्येक गावात असावी. त्यामुळे सर्व सामाजामध्ये एकोपा राहतो. यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. पूर्वी आमच्या गावची पाण्याची पातळी ५०० फुटावर होती. आज ती २० फुटावर आली आहे. यासाठी जलयुक्त शिवार योजनांची सर्वाना सोबत घेऊन प्रभावीपणे अमलबजावणी केली. विधवांना समाजामध्ये दुर्लक्षित केल्या जाते. पण आम्ही दरवर्षी विधवांची भाऊबीज साजरी करतो. महाराष्ट्रातील दिव्यांगाचा विवाह-मेळावा आयोजित करून विवाह-सोहळा पार पाडतो. शेतीमध्ये अत्याधुनिकता आणण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतो या सर्व सामाजिक कार्याची आणि गावाच्या विकासाची दखल बीबीसी (ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) ने नोंद घेतली आहे.
अध्यक्षीय समारोपमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले समाजात, विद्यापीठात, महाविद्यालयात चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीचा विद्यापीठातर्फे नेहमीच सन्मान करत आला आहे. या व्यक्तीवरच समाजाचे व भारताचे हित आणि देशाचा विकास अवलंबून आहे. विद्यार्थी दशेतूनच विद्यार्थ्यांनी काहीतरी वेगळा विचार करून वेगवेगळे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अशाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. सर्वप्रथम ठीक ११:०० वा. हुतात्मादिनानिमित्त दोन मिनिटाचे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत, विद्यापीठ गीत आणि स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये विवध पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करतांना लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाचे दिव्यांग कर्मचारी आनंद हिबारे यांना उत्कृष्ट प्रशासकीय कर्मचारी म्हणून सन्मानित करण्यात आले. तरुण संशोधक पुरस्कार लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. क्रांती सातपुते यांना आणि विद्यापीठ परिसरातील संगणकशास्त्र संकुलातील प्राध्यापिका डॉ. अर्चना साबळे यांना देण्यात आला. उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. रोहिदास नितोंडे यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप शाल, ग्रंथ, सन्मानपत्र, विद्यापीठ सन्मानचिन्ह व पंधरा हजार रुपयांचा धनादेश असे आहे. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार शहरी भागासाठी लातूर येथील दयानंद औषधनिर्माण महाविद्यालय यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप शाल, ग्रंथ, सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह व पस्तीस हजार रुपये धनादेश असे आहे.
विद्यापीठातील नेट, सेट, पीएच.डी. प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचाही गुणगौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. रवी सरोदे, डॉ. सरिता यनावार, डॉ. अशोक कदम, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, डॉ. आर.एन. आडुदे, डॉ. अरुण हंबर्डे, डॉ. नागेश खडकीकर व मधुकर आळसे यांचा समावेश आहे. यानिमित्त विद्यापीठातील पेटंट प्राप्त शिक्षकांचा ही सन्मान करण्यात आला यामध्ये डॉ. राजाराम माने, डॉ. गिरीश चौधरी, डॉ. पराग भालचंद्र, डॉ. पवन वासनिक, डॉ. विकास हुंबे, डॉ. वाणी लातूरकर, डॉ. बालाजी मुधोळकर, डॉ. विजय उत्तरवार, डॉ. हणमंत पाटील, डॉ. राजेश शिंदे, डॉ. मोबिनखन पठाण, डॉ. संगीता माकोने, डॉ. अर्चना साबळे, डॉ. वसंत वाघ, डॉ. महेश जोशी, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. अनुपमा पाठक, डॉ. हेमलता भोसले, डॉ. सुनील हजारे, डॉ. आशिष गुळवे, डॉ. शैलेश वाढेर, डॉ. एस जी गट्टानी, डॉ. शशिकांत ढवळे, डॉ. शैलेश पटवेकर, डॉ. एस.आ.र बुटले, डॉ. आर.व्ही. क्षीरसागर, डॉ. राजकुमार मून आणि डॉ. टी. एम. कल्याणकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांनी केले तर मानपत्राचे वाचन डॉ. पी. विठ्ठल यांनी तर आभार माध्यमिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने पहिल्या सत्रातील कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.