किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकवाडी येथील विद्यार्थ्यांच्या संघानी यशाची परंपरा कायम ठेवली असून तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेतील खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.


मातोश्री कमलबाई ठमके इंग्लिश स्कूल कोठारी येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत खो-खो खेळात 14 वर्षाखालील मुले आणि मुली या दोन्ही गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकवाडी संघांनी प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत तालुक्यातील नामांकीत शाळेतील संघाना पराभूत केले.


विशेष म्हणजे गतवर्षी सुद्धा याच शाळेतील मुले आणि मुली दोन्ही संघ जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. आतापर्यंत या स्पर्धेत विजयी संघ विद्यार्थ्यांचे गावातील पालक तसेच शिक्षणप्रेमी, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व शाळेचे मुख्याध्यापक शेख इब्राहीम व सहशिक्षक मुंडे सर, पवार सर, गायकवाड सर, कोटरंगे सर व गड्डमवाड सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
