नांदेड| जिल्हा परिषद आणि शासन स्तरावील राबविण्यात येणा-या विविध योजनाची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी तसेच अभ्यासपूर्ण उपाययोजना सुचविण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासक (Rural Fellows) हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून आज त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
जिल्हा परिषदेच्य यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. किरणकुमार बोंदार, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उप शिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, सहाय्यक शिक्षण उप निरिक्षक हनुमंत पोकळे, सांखिकी विस्तार अधिकारी सुधीर शिंदे आदींची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यावेळी म्हणाल्या की, ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. परंतू अनेक वेळा ही कामे वेळेत होत नाहीत. त्यात काही अडचणी येतात. नेमकेपणाने या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि अभ्यासपूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत, महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासक (Rural Fellows) निवडले जातील आणि त्यांना तीन महिन्यांसाठी विविध गटात काम करण्याची संधी दिली जाईल. या कालावधीत हे विद्यार्थी गावस्तराव जावून विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीचा सखोल अभ्यास करणार आहेत. यावेळी त्यांनी योजनांचे मुल्यांकन, निरिक्षण करुन त्यावरील उपाय योजना सुचवायच्या आहेत. जिल्हयातील आवड असणारे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे शंभर युवक-युवती यात सहभागी असतील.
5-5 युवकांचा एक गट तयार करण्या येणार असून त्यात एक प्राध्यापक राहणार आहेत. या उपक्रमात कोणताही भत्ता अथवा प्रवास खर्च दिला जाणार नाही. आवड असणाऱ्या युवकांनी यात सहभाग घ्यावा. सहभागी अभ्यासकांनी त्यांच्या संशोधनावर आधारित योग्य सल्ला द्यावा. त्यांनी केलेला अभ्यास आणि दिलेला सल्ला ग्रामीण भागातील योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यास मदत करेल. या अभ्यासाचा शेवटी एक शोध निबंध (Research Paper) सादर केला जाईल, ज्यामुळे शासन आणि जिल्हा परिषद यांना योग्य दिशा मिळेल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल म्हणाल्या.
या उपक्रमामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाचा अभ्यास व संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासातून गावस्तरावरील योजना राबवितांना येणा-या समस्यां, समज आणि त्यावरील उपाय योजना तयार करुन सादरीकरण करावयाचे आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले. तीन महिन्यानंतर उत्कृष्ट संशोधन सादर करणा-या विद्यर्थ्यांस जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण फेलोशिप आवॉर्ड देवून गौरव करण्यात येणार आहे. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमापत्र देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्य शुमभ तेलेवार, जिल्हयातील विविध महाविद्यालयाचे 60 युवक-युवती व प्राध्यापक यांची उप