हिमायतनगर। कारला येथे स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात करण्यात आली असून घरोघरी जाऊन हे आँनलाईन अभियान सुरू केले प्रत्येक नागरिकांचे कुटुंब माहिती भरून घेण्यात यावे असे आवाहन ग्रामसेवक नारायण काळे यांनी केले आहे.


कारला गावातील लाडकी बहिण योजनेचे आँनलाईन ,आफलाईन फार्मचा आढावा, स्वच्छ गाव कुटुंब गृहभेट अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.ग्रामप़चायंत आॅपरेटर यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती आँनलाईन भरण्याच्या सुचना दिल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कारला गावात अभियान ग्रामसेवक नारायण काळे यांनी सुरु केले आहे.

तसेच गावातील आगंणवाडी साहित्य वाटप करून गावातील पाहणी केली.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेल्या गावातील मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असुन तेही काम पाहण्यासाठी टीम बोलावली होती.सदरील काम लवकरच करून देणार असल्याचे गुत्तेदार सुर्यवंशी यांनी सांगितले. गावात पावसाळ्यात पाणी साचत आहे ते नैसर्गिक असुन आजपर्यंत च्या कार्यकाळात विकास झाला नाही ते या काळात सुरू आहे.

नागरीकांना दिलेल्या वचनांची पूर्तता होत आहे परंतु काही लोकांना विकास पाहवत नाही त्यामुळे ग्रामपंचायत ची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे त्यांनी आपला स्वार्थ न पाहता गावच्या विकासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन सरपंच कदम यांनी केले याबरोबरच गावातील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा आढावा घेतला यावेळी ग्रामसेवक नारायण काळे, सरपंच गजानन कदम, सदस्य सोपान बोंपीलवार, गजानन मिराशे, तुकाराम कदम,आपरेटर नागसेन गोखले, साहेबराव घोडगे, उपस्थित होते.
