हिमायतनगर| तालुक्यातील तेलंगणा बॉर्डरवर असलेल्या आदिवासी बहूल भागातील दुधड, वाळकेवाडी येथील शासकीय अनूदानीत आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यानी सलग दुसऱ्या वर्षीही उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेऊन विभागीय क्रिडा स्पर्धेत भरारी घेत पहिल्या, दुसऱ्या, व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त करून हिमायतनगर तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
नांदेड जिह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या दुधड, वाळकेवाडी येथील शासकीय, अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी राळेगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजित विभागीय क्रिडा स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या आहेत. यात १९ वर्ष वयोगटातील मुलींनी सहभाग घेतला होता. अटी तटीच्या लढतीत अखेर दुधड आश्रम शाळेच्या संघाने रोमहर्षक विजय संपादन केला. तसेच १९ वर्ष मुली ४×१०० रिले तृतीय क्रमांक पटकाविला आहे. १७ वर्ष मुली ४×४०० तृतीय क्रमांक पटकावत सांघिक क्रिडा प्रकारात १ सुवर्णपदक तर २ कांस्यपदक मिळविले आहे.
मुली १९ वर्ष वयोगट लांब उडी या स्पर्धेत कु. अनुराधा गजानन पिंपळे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. २०० मिटर धावने या स्पर्धेत कु. श्रेया संजय सुदेवाड हिने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच कु. अंजना लक्ष्मण खरवडे, आकाश राजू गेडाम, विशाल घोटेकर, सुभाष बरडे, कु. दिपाली मुरमुरे, शिवचरण भांगे, जयशंकर कराळे, कु.सुरेखा सरकुंडे, या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सांघिक व वैयक्तिक क्रिडा प्रकारात ७ गोल्ड मेडल, २ शिल्वर मेडल, ४ ब्राझ मेडल मिळवित या शासकीय आश्रम शाळेच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यानी विभागीय क्रिडा स्पर्धेत आपली छाप पाडीत ग्रामीण भागातील विद्यार्थी हे कुठे कमी पडत नाहीत. असे दाखवून दिले आहे.
विशेष बाब म्हणजे १७ खेळाडू मुलींना ५% खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. नागपूर येथे २०२५ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे हे विद्यार्थी प्रतिनिधित्व करणार आहेत. उल्लेखनीय कार्य करणार्या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद चामे, प्रशिक्षक प्रा. सचिन शिंदे, एस. टी. सूर्यवंशी, प्रा. के. एन. सरोदे, प्रा. टि. एस. एम. बोरवनकर, डि. एम. सातलावार, प्रा. पि. पी. मुधोळकर, तुकाराम अडबलवाड, आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.