नांदेड l जिल्हा क्रीडा कार्यालय, नांदेड वाघाळा शहर महापालिका व ऑलम्पिक असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ जून रोजी जुना मोंढा ते जिल्हा क्रीडा कार्यालय गोकुळ नगर नांदेड यादरम्यान ऑलम्पिक मशाल रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या प्रमाणात या मशाल रॅलीस सहभागी झाले होते. नांदेड भूषण संत बाबा बलविंदरसिंगजी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत या ऑलम्पिक मशाल रॅलीस प्रारंभ करण्यात आला.


जुना मोंढा येथे सकाळी ८ वाजता आयोजित ऑलम्पिक मशाल रॅली उद्घाटन प्रसंगी नांदेड ऑलम्पिक संघटनेचे चेअरमन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जनार्दन गोपीले, कार्याध्यक्ष प्रलोभ कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा संघटक डॉ. हंसराज वैद्य, डॉक्टर दीपक बच्चेवार ,अध्यक्ष जसविंदरसिंघ रामगडिया, सचिव डॉ राहुल वाघमारे , जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी बालाजी शिरशीकर,संजय बेतेवार, उपाध्यक्ष बालाजी जोगदंड, डॉ.रमेश नांदेडकर, विक्रम खेडकर, विनोद गोस्वामी, आर. टी. रमणबैनावाड, बी. एम. कलमसे, कोषाध्यक्ष जयपाल रेड्डी, सहसचिव विनोद जमदाडे, वृषाली पाटील जोगदंड, कुलदीप सिंग जट, डॉ. राजेश जांभळे, सदस्य बाबुराव खंदारे, बंटी सोनसळे, राष्ट्रपाल नरवाडे यांच्या समवेत विविध क्रीडा संघटना पदाधिकारी उपस्थित होते.संत बाबा बलवीदर सिंग जी यांच्या हस्ते ओलंपिक मशाल रॅली पेटवून हिरवी झेंडी दाखवण्यात आली.


जुना मोंढा,महावीर चौक, हनुमान पेठ, पोलीस अधीक्षक कार्यालय, कला मंदिर, शिवाजीनगर महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले पुतळा ते जिल्हा क्रीडा कार्यालय यादरम्यान ही ऑलिंपिक मशाल रॅली काढण्यात आली होती.अतिशय शिस्त विविध रंगाची ध्वज समोर तिरंगा ध्वज त्या पाठीमागे ऑलिम्पिक मशाल रॅली असा क्रम यावेळी संयोजकांनी ठेवला होता.या ऑलम्पिक रॅलीची सांगता जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड या ठिकाणी करण्यात आली. या मशाल रॅली यशस्वीतेसाठी विविध क्रीडा संघटना ऑलम्पिक असोसिएशन नांदेड यांनी पुढाकार घेतला होता. प्रास्ताविक डॉक्टर राहुल वाघमारे, संचलन प्रलोभ कुलकर्णी तर विनोद जमदाडे यांनी आभार मानले.




