बिलोली| बिलोली येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी (मशीन) सेंटर ची सेवा उपलब्ध झाली असून गरोदर मातांच्या नियमित तपासणी अंतर्गत गरजेनुसार गरोदर मातांची सर्व गरोदर सोनोग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पावडे यांनी दिली.


बिलोली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर ची मागणी होती .त्या अनुषंघाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनानुसार बिलोली शासकीय रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पावडे यांनी सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता पूर्ण करून सोनोग्राफी सेंटर ची सेवा सुरु केले असून दि.12 जुलै रोजी उदघाटन सौ.दीक्षा वाघमारे नावाच्या गरोदर मातेच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पावडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात बिलोली येथे दर बुधवारी डॉ.विजय कुमार मोरे स्त्री रोग तज्ञ यांच्याकडून गरोदर मातांच्या नियमित तपासणी अंतर्गत तसेच गरजे नुसार गरोदर मातांची सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले तसेच ही सोनोग्राफी मोफत केल्या जाणार असून बिलोली तालुक्यातील गरोदर मातांनी यांच्या लाभ घेण्याचे आव्हान त्यांनी केले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पावडे हे स्वता जनरल सर्जन त्यांच्या सोबत वैद्यकीय अधिकारी डॉ अश्वनी अनमवार हे ग्रा.रुग्णालय देगलूर,नायगाव,भोकर,धर्माबाद, अशा विविध ठिकाणी शस्त्रक्रिया शिबिरात शस्त्रक्रिया करत असतात. तसेच बिलोली उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पांडुरंग पावडे सोबत सर्जन अश्वनी अनमवार व डॉ.विजय कुमार मोरे हे नियमित दर गुरुवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया तसेच हर्निया, हाइड्रोसिल,स्तनाच्या गाठी, इतर लहान मोठ्या शस्त्रक्रिया करत असतात तरीही बिलोली तालुक्यातील गरजु रुग्ण व लाभार्थीयांचा लाभ घेण्याचे आव्हान वैद्यकीय अधीक्षक डॉ.पांडुरंग पावडे यांनी केले.
