नवीन नांदेड। श्री स्वामी समर्थ महाराज प्राणप्रतिष्ठा निमित्ताने भव्य मिरवणूक, महापूजा व मुर्ती प्राणप्रतिष्ठा , महाप्रसादाचे आयोजन ३० जुन रोजी करण्यात आले आहे.
दत मंदिर श्रीपाद नगर कौठा येथे मित्ती ज्येष्ठ कृ. ९, शके १९४६ रविवार, दि.३० जुन २४ रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्राणप्रतिष्ठा दतमंदीर श्रीपाद नगर कौठा नांदेड येथे संपन्न होणार आहे. मिरवणुक सकाळी ९ ते १२ वा.रविनगर, विठ्ठल रुक्माई मंदीर ते श्रीपाद नगर, दत्त मंदीर महापुजा, होमहवन व मुर्ती प्राणप्रतिष्ठा दुपारी १२ ते २ पर्यंत महाप्रसाद दुपारी २ ते आपल्या आगमनापर्यंत, पंचपदी सायंकाळी ६:३० वाजता, या सोहळ्याला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे.
असे आवाहन माजी नगरसेवक राजु पाटील काळे, माजी नगरसेवक राजु पाटील गोरे,माजी नगरसेवक पांडुरंग काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगा प्रसाद काकडे,विठ्ठल गोविंदराव काळे (समिती अध्यक्ष),शाम रापतवार,मकरंद चौधरी, कृष्णा काळे, भिमाजी बंगरूळे,पांडुरंग काळे,सतिश ठुबे, शंकर बालाजी धोंडे व समस्त श्रीपाद नगर मित्र मंडळ,जुना कौठा,नांदेड व रोहित शास्त्री अडकटलवार यांनी केले आहे.