हिमायतनगर,अनिल मादसवार| महाशिवरात्र ते होळी या पर्वकाळात नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या दत्तमंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव परीसरात दिनांक ६ ते १३ मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी महायज्ञाचे आयोजन (Shiv Mahapuran Story 108 Kundi Vishwashanti Dattayag Maha Yagya in the Month of March Successfully Prepared at Pimpalgaon) करण्यात आले आहे. या कथेसाठी भारतातील १ लाख गायीची सेवा करणारे संत श्रीश्रीश्री १००८, अयोध्या येथुन १००, वृंदावन येथुन ५०, ऋषिकेश जगन्नाथपुरी, बद्रिनाथचे मुख्य पुजारी, ऊज्जैन जगद्गुरू संत महंतांसह महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील ३०० ते ४०० साधुसंत, महंतांच्या विशेष ऊपस्थीमध्ये सप्ताह सत्संग सोहळा होणार आहे. अशी माहिती बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना दिली आहे.


भूतो नं भविष्यती होणाऱ्या सत्संग सोहळा अनंत श्रीविभुषित श्रीमज्जगद्गुरू द्वाराचार्य श्री अग्रपिठाधिश्वर तथा मलूक पिठाधिश्वर स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज श्रीसेवा वृंदावन धाम उत्तरप्रदेश यांच्या मधुर वाणीतून भव्य शिवमहापुराण कथा आणि १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर- प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प.पु. गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आमंत्रित केले आहे.

या भव्यदिव्य सोहळ्याला लाखोंच्या संख्येने येणारे भाविक भक्त व देशभरातून शेकडोच्या संख्येत येणारी जगतगुरु, महामंडलेश्वर, शिवाचार्य, पिठाधिश्वर, संस्थानिक व संतांच्या परंपरेतील दिव्य विभूती दर्शन देण्यासाठी येणार आहेत. तसेच साधू संत महंत मंडळी आणि राजकीय मंत्र्याच्या आगमनाने हा सत्संग सोहळा दिव्य अनुभूती देणारा ठरणार आहे. या धार्मिक सत्संग सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून, हा धार्मिक सप्ताह सोहळा यशस्वी होण्यासाठी भाविक भक्तांसह खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, आ. बाबुराव कदम कोहळीकर, माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची सात दिवस उपस्थीती राहणार आहे. शिव महापुराण कथेनंतर दररोज लाखो भाविकांना महाप्रसाद दिल्या जाणार आहे. महाप्रसाद महिला आणि पुरुषांना वेग वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

कथेसाठी येणाऱ्या महंतासाठी २७ वातानुकूलित भक्त निवास, ५० राजस्थानी खुंट्या, हदगाव, तामसा, भोकर येथे वातानुकूलित सेवा असणारी सुविधा करण्यात आली आहे. १८ एकर जमिनीवर ३०० बाय ५०० आकाराचा कथेचा सभामंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शंभर एकर जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. आपल्या भागात एवढ्या मोठ्या स्वरूपांत शिवमहापुराण कथा सोहळा होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांसह इतर जिल्ह्यातील भाविक भक्त व गावकरी वेगवेगळ्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून सेवा देणार आहेत. धर्मकार्यात धर्मांची जागरूकता, धर्माच्या अखंडतेसाठी युवा, तरुणवर्ग, भक्त वर्गाने शिवमहापुराण कथा सोहळा यशस्वी होण्यासाठी या कथा कुंभ सोहळ्यात सहभागी होऊन सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा आणि आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे असे आवाहन प. पु. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केलं आहे.
