नांदेड| लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्री शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे अशी माहिती संयोजक श्री दिगंबर कदम यांनी दिली आहे.
श्री यशवंतराव ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता उमरीच्या वतीने घेण्यात येणार्या २० व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन श्री शाहू महाराज हायस्कूल भोकर जि नांदेड येथे दि.३ जाने.२०२५रोज शुक्रवार रोजी आयोजित केले आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी श्री शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे अशी माहिती संयोजक श्री दिगंबर कदम यांनी दिली आहे.
श्री शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर हे उमरी कृउबास उमरी चे सभापती आहेत. तर उमरी पं.स .उमरी चे उपसभापतीपद भूषविले होते. त्यांचा शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक सेवेत मोठाच सहभाग राहिला आहे. त्यांच्या निवडीचे नुकतेच स्वागत करण्यात आले. हे २०वे लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन अविस्मरणीय होण्याच्या दृष्टीने त्यांनी तशा सूचना देऊन कामाला लागले आहेत.अशी माहितीही देण्यात आली आहे.