श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर तालुक्यातील कुपटि हिंगणी, ईवळेश्वर, येथील नदि नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सूरु आहे. दि,२५ सेप्टेंबर च्या रात्रीला वाळू भरुन वाहतूक करत असतांना कुपटि येथील पुला वरुन टिप्पर पल्टि झाल्याची घटना घडली आहे
बूधवार दि,२५ रोजी रात्री ३ वा, च्या दरम्यान टिप्पर क्र,एम,एच २६ बिई ,,,,हे ईवळेश्वर,कुपटि माडवा,वानोळा मार्ग वाई बाजार कडे जात असतांना कुपटि जवळील कठडे नसलेल्या पुलावरुन अंदाजे २० फुट खाली पडले या अपाघातात चालकासह तीन मजुर गंभीर जखमी झाले असून एक मजूराचे हात धडा वेगळे झाल्याची चर्चा आहे.
जख्मी झालेल्यानां रातोरात यवतमाळ येथे उपचारा करीता दाखल केले असल्याची माहीती आहे, सकाळीच परीसरात चर्चा झाल्याने नागरीकांनी घटनास्थळी धाव घेउन पाहनी केली अपघात झालेल्या टिप्परचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडिया वर व्हायरल केले.
फोटो व्हायरल होताच संबंधित टिप्पर मालकाने घटनास्थळा वरून घाई गडबडीत टिप्पर काढून नेले. सदरील घटनास्थळ माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने आमच्या प्रतिनिधीने सपोउनी शिवप्रकाश मुळे यांची प्रतीक्रिया घेतली असता मि घटनास्थळी भेट दिली असून अपघातग्रस्थ वाहनाचे फोटो काढले असून गुन्हा दाखल करणार असल्याचे सागितले.