नांदेड l अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संघमचे अध्यक्ष बाबूराव मँडम व उपाध्यक्ष गोपाल गोरंट्याल यांच्या उपस्थितीत हैद्राबाद येथे झालेल्या बैठकीत रोहित शेठ अडकटलवार यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
पद्मशाली समाजासाठी देश पातळीवर काम करणारी युनायटेड पद्मशाली संघम ही संघटना असून या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव मँडम व उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक गोपाल गोरंट्याल यांच्या उपस्थितीत हैद्राबाद येथे नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत संघटनेने केलेल्या कामाचे मुल्यमापन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रात पद्मशाली समाजासाठी भरीव काम करण्याचे धोरण ठरविण्यात आले.
महाराष्ट्रात पद्मशाली समाजासाठी काम करायचे असल्यास संघटनेचा राज्यात विस्तार करण्याचे धोरण सदरच्या बैठकीत ठरवण्यात आले. अखिल भारतीय युनायटेड संघमच्या विस्तारासाठी सक्षम पदाधिकाऱ्याची गरज असल्याने नांदेड जिल्ह्यातील एक नामांकित उद्योजक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रोहीत शेठ अडकटलवार यांची संघमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदरच्या निवडीबद्दल शंकरराव कुंटूरकर, चंद्रकांत अलकटवार, जगन्नाथ बिंगेवार, राजू यन्नम, ईश्वर येमूल, संजय चिंतेवार, राजमोहण हिरमलवार, बालासाहेब माधसवाड, नागेश पुठ्ठा, प्रभाकर लखपत्रेवार, दशरथ नंदाला, श्रावणकुमार वेमूला, नागेंद्र अलीशेट्टी, श्रीनिवास भुसावार, महेंद्र दासरवार यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.