नांदेड| नांदेड शहरातील प्रसिद्ध सिटी सिन्फनी या हॉटेल मध्ये जुगार सुरु असताना विमानतळ पोलिसांनी छापा टाकून 9 जुगाऱ्यासह एकुण 1,14,470/- रुपयाचा मुद्देमाल जुंगराचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. विमानतळ पोलीस नांदेड यांनी केलेल्या या धमाकेदार कार्यवाहीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून, हायप्रोफाईल जुगारावर उत्कृष्ठ कार्यवाही केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पोलिसांचे अभनंदन केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरात अवैद्य धंदयावर कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन विमातळ नांदेड येथील प्रभारी पोलीस अधिकारी गणेश चव्हाण हे गुन्हे शोध पथकातील पो.उप. निरीक्षक साने, पोहेकॉ/ 2166 राठोड, पोहेकॉ / 2403 पठाण, पोकॉ/555 माने, पो.कॉ /480 स्वामी, पो.कॉ/ 774 सुखई, पो.कॉ 3097 शोएब, चालक पो.उप. निरी. भोसीकर, चालक पो.कॉ / 2779 साईप्रसाद सोनसळे सह दिनांक 23/08/2024 रोजी अवैद्य धंदयाची माहीती काढुन केसेस करणे कामी पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यान गुप्त खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, हॉटेल सिटी सिन्फनी येथे 09 इसम जुगार खेळत आहेत. यावरून सदर ठिकाणी 21. 40 वा छापा टाकला असता तेथे इसमाकडुन जुगाराचे साहीत्य व नगदी असे 1,14,470/- रुपये रोख रक्कम मिळुन आली आहे. त्यावरुन पो.स्टे. विमानतळ नांदेड येथे गु.र.न. 335/24 कलम 04,05 महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास चालु आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक उप. विभाग नांदेड शहर, पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण पो.स्टे. विमानतळ नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी पार पाडली आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी चांगली कामगीरी केली यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.