हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर भगवान नवसाला पावनारा म्हणुन संबध जिल्ह्यात ख्यातीप्राप्त आहे. माघ कृ.13 दि.१७ मंगळवारी महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर जिल्हयासह मराठवाडा-विदर्भ- तेलंगाना, आंध्रप्रदेशातील लाखो भावीकांनी श्रीचे दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. या निमित्ताने हिमायतनगर शहरात भक्तांची मंदियाळी दिसुन आल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारण्याच्या उपवास धरुन सायंकाळी सुर्यास्तापर्यन्त लाखो भावीक भक्तांनी मध्यरात्री १२ च्या नंतर दर्शनासाठी गर्दी केली होती. भक्तांच्या सुवीधेसाठी मंदिर समीतीने शिवरात्रीच्या पावन पर्वानीमीत्ताने भाविक भक्तांना विश्वहिंदू परिषद व बजरंग दल यांच्यातर्फे दुधाचे वितरण, श्री विश्वकर्मा कारपेंटर एकता युनियन तर्फे केळीचे वितरण, बुलढाणा अर्बन, महाराष्ट्र बैंक व पवन फर्निचर तर्फे भाविकांना उपवासाच्या फराळाचा साबुदाणा वितरण करण्यात आले.


महाशिवरात्री नीमीत्ताने मंदिराच्या कळसाच्या, मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली असल्याने मंदिर परिसर खुलून दिसत होते. श्री दर्शनासाठी वाडी -तांडे, खेडयापाड्यातुन सहपरीवारासह मिळेल त्या वाहनाने भक्तांचे लोंढे दाखल झाले होते. दुपारनंतर भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळाले आहे. महाशिवरात्रीचे औचीत्य साधुन मंदिर परीसरात बील्वपत्रे, मीठाई, फराळाचे साहीत्य तर मुख्य रस्त्यावर फळे- फुलंासह विवीध वस्तु – पदार्थाची सजलेली दुकाने व रांगेसह परिसरातील भक्तांच्या अफाट गर्दीमुळे हर हर महादेव… परमेश्वर महाराज कि जय नामाचा घोष होऊ लागल्याचे चित्र दिसुन आले आहे. महाशीवरात्रीच्या दिवशी दिवसातुन 3 वेळा श्री चे दर्शन घेण्याची प्रथा परंपरेनुसार चालत आली असुन, सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळा श्री परमेश्वराचे सगुनरुपी दर्शन वेगवेगळ्या रुपात होते, असे जुने जानकार सांगतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख यांनी उपस्थीत होऊन, श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. दुपारी शीवलीलामृत ग्रंथाचे वाचन व रात्री 8.30 वाजता हभप.बालयोगी गंजेन्द्र महाराज यांच्या कितर्नाचा कार्यक्रम संपन्न होताच शिवापती मंदिरातील शिव – पावर्तीचा अभीषेक सोहळा होऊन मध्यरात्री 01 ते 3 वाजेच्या दरम्याण संपन्न झाला. मंदिर संस्थानचे पदसीध्द अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहीत कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राम्हण गुरुंच्या वेदशास्त्रींय मंत्रोच्चाराच्या जयघोषात अभीषेक, महापुजा व श्रीच्या मुर्तीचा अलंकार सोहळा मोठ्या थाटात करण्यात आला.

माहूर येथील वतनदारांच्या पुजेनंतर मध्यरात्री उशीरा श्रीच्या मुर्तीला सोने, चांदीचा अलंकार, टोप, चंद्रहार, दोन, तीन व पाच पदरी हार, कर्णकुंडल, कंबरपट्टा, नेकलेस, बाजूबंद, पैंजण, कडे, ब्रॅसलेट आदींसह अन्य आभुषने मंदिराचे विश्वस्त संचालक मंडळींंच्या उपस्थीतीत चढवीण्यात आली. यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसिलदार हिमायतनगर, उपाध्यक्ष महावीसेठ श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, प्रकाश कोमावार, सौ. लताबाई मुलंगे, सौ. लताबाई पाध्ये, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, राजाराम झरेवाड, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड व लिपीक बाबुरावजी भोयर, तसेच स्वयंसेवक, पोलीस बांधव, विविध समित्यांचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थीत होते.

अलंकारमय मूर्तीच्या संरक्षणासाठी बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त
शिवरात्रीच्या दुस-या दिवशी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तंाकडुन बँड – बाज्याच्या गजरात मिरवणुक काढुन भगवे झंडे उभारून पुजा- अचर्ना करण्यात येते. आणि श्री परमेश्वरच्या चरणी दाळ -भात, पुरण-पोळी व गुळाचे नैवेद्य दाखऊन पारण्याचा उपवास सोडला जातो. हा अदभुत व भक्तीमय सोहळयाचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, आंध्रप्रदेशासह राज्यातील कानाकोप-यातुन भावीक भक्तांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी मंदिर परीसरात बंदुकधारी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला. मंदिर समितीने देखील आपले स्वयंसेवक उभे करून रांगेला शिस्त लावली. तसेच मंदिरासह सर्व परिसरात ५० हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे उभारावून यात्रेच्या हालचालीवर नजर ठेवली आहे.
तहसीलदार यांनी केली नियोजनाची पाहणीश्री परमेश्वर मंदिर कमिटीच्या पदसिद्ध अध्यक्ष पल्लवी टेमकर यांनी मंगळवारी यात्रा नियोजन संदर्भात भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी समितीला यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी पोलीस बंदोबस्तात श्रीचे अलंकार आणण्यात आले व महाशिवरात्रीला हर्षोल्हासात अलंकार सोहळा पार पडला. अलंकार विभूषित श्री परमेश्वर मूर्तीचे दर्शन भाविक भक्तांना दहीहांडी गोपाल काल्यापर्यंन्त घेता येणार असून, अलंकारमय श्री परमेश्वर मुर्ती पाहुन भावीक भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहेत.