नांदेड| शहरात जनतेला सूचना व मार्गदर्शन करून मोटार वाहन कायदा व वाहन चालविताना पाळण्याचे नियम संबंधाने जनजागृती करण्यात आली.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, साहेबराव गुट्टे, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, वजिराबाद यांचे मार्गदर्शनाखाली जसपालसिंग कोटतिर्थवाले पोउपनि वाहतूक शाखा, वजिराबाद नांदेड व एम. जी. एम. कॉलेज, नांदेड यांनी संयूक्तपणे जनजागृती करण्यात आली.


दिनांक 29 रोजी आय. टि. आय. चौक, वजिराबाद चौक, नांदेड येथे जनतेला 1) ट्राफिक सिग्नलचे नियम पाळणे 2) वाहन पार्कीगचे नियम व इतर मोटार वाहन कायदाचे नियम पाळणे 3) वाहन ओव्हर स्पीड चालविल्यास त्यांचे काय परिणाम होतात 4) दारू पिऊन वाहन चालविल्यास याचे काय दुष्परिणाम होतात. याबाबत सूचना व मार्गदर्शन करून जनतेत मोटार वाहन कायदा व वाहन चालविताना पाळण्याचे नियम संबंधाने जनजागृती करण्यात आली.
