नांदेड,अनिल मादसवार| मराठा समाजाला ओबिसीतुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी १७ सप्टेंबर रोजी पासुन मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत परंतु शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी यांंना निवेदन देऊन येत्या दोन दिवसांत मागण्या मान्य करून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यास परावृत्त न केल्यास सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी नांदेड बंदची हाक देण्यात आली.
सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, हैद्राबाद सह सातारा,बाॅम्बे गव्हर्नमेंटचे गैझेट लागु करावे,अंतरवाली सराटी सह संपुर्ण महाराष्ट्रातील गुन्हे सरसकट मागे घेण्यात याव्या, राज्यभरात कुणबी नोंदणी तपासणी मंदगतीने चालु आहे ती त्वरीत जलद गतीने चालु करावी,ई.ड्ब्लु.एस.सह ई.एस.बी.सी. आणि कुणबी हे तिनही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत,१ जुन २००४ चा कायद्यात सुधारणा करुन मराठा व कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करावा या मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत पाच वेळा उपोषण केले आहे.
आता सहाव्यांदा उपोषणाला ते बसले आहेत. सरकारने येत्या दोन दिवसांत मागण्या मान्य करून जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यास परावृत्त करावे अन्यथा सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा कडकडीत बंद करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना अखंड मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले यावेळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते.