नांदेड| समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंग यांच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते या लिफ्टचे उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला.
समाज कल्याण कार्यालयात सद्यस्थित ” मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनासाठी नांदेड जिल्हयातील 60 ते 65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरीक यांची कार्यालयात ये-जा सुरु आहे. ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तींच्या सोईसाठी सामाजिक न्याय भवनमध्ये लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
या लिफ्टचा लाभ ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तीसाठी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरीकांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय भवनातील लिफ्टच्याच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी उपस्थित राहल्यामुळे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले .