दापोली। खान्देश विदर्भातील नागरिकांना कोकण प्रांताकडे जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून (peoridicity)प्रायोगिक तत्वावर बल्लारशाह सावंतवाडी रोड हाॅलीडे एक्स्प्रेस सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे. त्या संदर्भात राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी मध्य रेल्वे महाप्रबंधक मा.श्री.रामकरण यादव यांच्याकडे लेखी निवेदन कार्यालयास सादर करून केली आहे.
मध्य रेल्वे महाप्रबंधक मा.श्री.रामकरण यादव यांच्याकडे लेखी निवेदन कार्यालयास सादर करून अशी मागणी केली आहे की, नागपूर येथील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची दिक्षाभुमी, वर्धा येथील सेवाग्राम महात्मा गांधीचे आश्रम,अमरावती येथे संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरी बरोबरच मूर्तीजापूर येथील दत्त- कार्तिक स्वामी मंदिर,बुलढाणा जिल्ह्य़ातील शेगांव येथील भाविकांचे आराध्य दैवत संत शिरोमणी गजानन महाराज समाधीस्थळ-पाचधाम,सिंधखेडराजा येथील माॅ जिजाऊ जन्मस्थळ आणि नांदुरा येथील जगप्रसिद्ध एकशे पाच फुटी हनुमानाच्या मूर्ती,रत्नागिरी गणपुतीपुळे लंबोदर,देवगड कुणके ळश्वर दिर्बादेवी, मालवण भराडी,कणकवली भालचंद्र,वेंगुर्ले सातेरी मानसीश्वर रामेश्वर देवस्थान कोकणातील विदर्भ-खान्देशात व विदर्भ-खान्देशातील कोकणात असे असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने बुलढाणा,अकोला,अमरावती,वर्धा,चंद्रपूर परिसरात येत असतात. विदर्भ,खान्देश परिसरातील नागरिक कोकणातील निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी येत असतात.
बल्लारशाह ते सावंतवाडी रोड तृतीय साप्ताहिक गाडी सुरु करण्याची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. बल्लारशाह सावंतवाडी रोड प्रायोगिक तत्वावर उपरोक्त थांबे व विशेष रेल्वे प्रशासनाकडुन चालवण्यात आल्यास विदर्भातील प्रसिद्ध नागपूरी संत्री-सोनपापडी-संत्रा बर्फी,अमरावती येथील सीताफळ,शेगांव येथील प्रसिद्ध शेगांव कचोरी,जळगाव येथील केळी,नाशिक द्राक्ष,संगमनेरची डाळींबांचा स्वाद कोकणवासीयांना रेल्वेसेवेमुळे कोकणातच घेता येईल.कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा,आंबा पोळी,आमरस,फणसपोळी,कडकबुंदी लाडू, मालवणी खाजा,काजुगर,सावंतवाडीची लाकडी खेळणी इ. विदर्भातील नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे.याद्वारे अनेकांना रोजगार उपलब्ध होऊन रेल्वे विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल.
मध्य रेल्वे प्रशासनाने बल्लारशाह चंद्रपूर सावंतवाडी रोड तृतीय साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी चालवण्याची मंजुरी दिल्यास खान्देश,विदर्भा भागातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळू शकेल. याप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार तरुण वर्गाला रोजगार उपलब्ध होईल आणि मध्य रेल्वे विभागाला सुद्धा मोठ्या प्रमाणात राजस्व प्राप्त होऊ शकतो.या सर्व बाबींचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर बल्लारशाह चंद्रपूर कल्याण मार्गे सावंतवाडी विशेष रेल्वे सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव राष्ट्रीय सरचिटणीस श्री.वैभव बहुतूले यांनी महाप्रबंधक मा.श्री.रामकरण यादव यांच्याकडे लेखी निवेदन कार्यालया सादर करून केली आहे.