नवीन नांदेड| राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विनायक आकुरके यांना नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यस्तरीय मराठा कुणबी भुषण पुरस्कार देऊन आमदार भावना गवळी व मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आले.


राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने आयोजित स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन नांदेड येथे २५ आगस्ट रोजी करण्यात आले होते, यावेळी विधान परिषदेचा आमदार भावना गवळी तर अध्यक्षस्थानी कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, प्रमुख पाहुणे डॉ.आनंद भगत,डॉ.राजेंद्र वानखेडे स्वागताध्यक्ष प्रभाकर इंगळे, व्यंकटराव जाधव,संजय कदम यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थिती होती. दरम्यान विविध शासकीय पदावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान करुन कुणबी मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरवले.


यात नवीन नांदेड भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा ऊधोजक विनायक मारोतीराव आकुरके पाटील प्रसिध्द उद्योजक युनायटेड इंजिनियअरींग वर्क, आवी स्टील, एम.आय.डी.सी.नांदेड. यांना राज्य स्तरीय कुणबी मराठा समाज पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र मध्ये आपल्या समग्र कार्याचा गौरव व्हावा ही या मानपत्रामागची भूमिका आहे. आपण करीत असलेल्या कार्यामुळे राष्ट्र उभारणीचे कार्य होत आहे.

महासम्राट बळीराजा, जगद्गुरु तुकाराम महाराज, शहाजी राजे, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आपणही शुन्यातुन कार्याची उभारणी केली आहे.आपण करीत असलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक कार्यातून समाज समृध्द होत आहे.आपल्या सामाजिक जाणीवेतून कुणबी मराठा समाजाची मान उंचावणारी आहे. आपल्या कार्यामुळे अनेक समाज बांधवांना प्रेरणा मिळून समाजहित साधणारे आहे. यामुळेच आपणास महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय कुणबी मराठा भूषण पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे असा उल्लेख केला आहे, सन्मान पत्र, मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्या बदल युवा नेते ऊदय देशमुख, नांदेड भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नवनाथ कांबळे, हंबर्डे व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.
