हिमायतनगर| शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये घानीचे साम्राज्य पसरले असून, घानी च्या दुर्गधीमुळे नागरीकांस विविध आजाराची लागण झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरांच्या स्वच्छतेची घडी संपूर्णतः विस्कटली असून नागरीकांस नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता वार्ड क्र. १७ सह शहरातील स्वच्छतेचे काम तात्काळ हाती घेऊन संपूर्ण स्वच्छता राखावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे यांनी केली आहे.
नगरपंचायत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात हेंद्रे यांनी म्हटले आहे की, नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्र. १७ मध्ये प्रताप लोकडे यांच्या सेतू केंद्रांच्या पाठीमागे नाला असून सदर नल्यामध्ये शहरातील सांडपाणी वाहून जाते. परंतू सदरील नाल्यामध्ये झाडे, झुडपे वाढली असल्याने केर कचरा वाहून न जाता नाल्यामध्ये अडकून पडला आहे. महा मार्ग रस्त्यावर असलेल्या पुलाचे बांधकाम पुर्णत्वास आल्यानंतर या नाल्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. परंतू नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतेच काम बरोबर होत नसल्याने नागरिक आता त्रस्त झाले आहेत.
शहरातील अनेक वॉर्डांमध्ये पावसाळ्या अगोदर ची कामे केली नसल्याने घानीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपंचायत प्रशासनाने वार्ड क्र. १७ चे नाली व शहरातील स्वच्छतेचे काम वेगाने करून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे यांनी केली असून, नगरपंचायत प्रशासना कडून विलंब झाल्यास लोकशाही मार्गांचा अवलंब करण्यात येईल. असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.