नायगाव। नरसी येथील सुप्रसिद्ध हजरत सय्यद खाकीशाह वल्ली यांच्या उरुसानिमित्त (Hazrat Syed Khakishah Valli Urusa and Sandal) निमित्त भव्यदिव्य संदल मिरवणूक रैली काढून मोठ्या उत्साहात असंख्य हिंदू -मुस्लिम बांधवांनी संदल दरम्यान अलोट गर्दीत करत राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवले.


नरसी येथील प्रसिद्ध हजरत सय्यद खाकीशाह वल्ली यांच्या नरसी येथे गुरुवारी सायंकाळी नरसीचे पोलीस इब्राहिम बेग पटेल यांच्या निवासस्थाना पासून भव्यदिव्य संदल रैली काढण्यात आली होती.या उरुसा निमित्त रक्तदान शिबीर व भडाऱ्यांचे आयोजन केले असून गुरूवारी बाबांच्या पवित्र दर्ग्यात मौलाना हाफीज उसमान, खारी शाहेद रजा, यांनी चादर अर्पण करत दुवा केली सर्व भाविक भक्तांनी दर्शन घेत तमाम हिंदु मुस्लिम समाजातील बांधवांना संदल उर्स उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी नरसीचे संदल चे मानकरी पोलीस पाटील इब्राहिम बेग.दर्गाह चे मुजावर व मुतावली सय्यद अजिम हाजी हुसेनसाब. सय्यद इसाक हाजी हुसेनसाब. हाजी सय्यद पिर साब .सय्यद शादुल साब. सय्यद आहेमद. सय्यद आमीनपाशा. सय्यद खादर. सय्यद मुनीर. सहशिक्षक सय्यद आरीफ.सय्यद अलीम.सय्यद मोहम्मद रफीक.लाईनमन सय्यद आदम. सय्यद सदाम.शेख वसीम सेट .सय्यद परीवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

तसेच हजरत सय्यद खाकीशाह वल्ली यांच्या शुभारंभ प्रसंगी काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी भिलवंडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सय्यद इसाक,प्रकाश गिरी.सदाम उर्फ लाला हबिबसाब खुरेशी. यांनी पवित्र बाबांच्या दर्ग्यात भक्तिभावे दर्शन घेतले.तर गुरुवारच्या पूर्वसंध्येला संदल दरम्यान शेख मोहद्दीन,शेख शादुल भाई,रफीक पठाण.माजीद भाई. नईम पटेल,शेख जलील,सदाम पटेल, नजीर बागवान, यासह पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस उपनिरीक्षक शिवराज नरवाडे, यांच्या वतीने उत्सव शांततेत होण्यासाठी चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी असंख्य हिंदू – मुस्लिम बांधव उपस्थित होते.
