नांदेड| येथील योग शिक्षक गजानन पाटील यांच्या योगा क्लासेसच्या वतीने निमा भवन गणेशनगर येथे गुरू प्रोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मुख्य मार्गदर्शक तथा प्रमुख पाहुणे म्हणून होमिओपॅथी तज्ञ डॉ. अशोक बोनगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही गजानन पाटील योग मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव रविवार दि. २१ जुलै रोजी साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या योग साधकांची उपस्थिती होती यावेळी निमा भवन येथील आयोजित गुरू पोर्णिमा सोहळ्यात योग शिक्षक राजू कोल्हे यांनी उपस्थित योग साधकांना योगाचे धडे दिले. महत्व पटवून सांगितले तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना होमिओपॅथी तज्ञ डॉ. अशोक बोनगुलवार यांनी सकारात्मक दृष्टीकोन व सकारात्मक जिवनपद्धतीचा अवलंब करण्याचे फायदे व त्यामुळे होणारे सकारात्मक लाभ याचे महत्व पटवून दिले ..