नांदेड| गेली २० वर्षापासून काँग्रेस तालुका व प्रदेशओबीसी विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी धनराज राठोड हे काँग्रेस कार्यकर्ता या नात्याने सातत्याने प्रयत्न करत असून धनराज राठोड हे उच्चशिक्षित असून जय जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून लोकापर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय सचिव या नात्याने समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडले संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट सेवागड गुत्ती बेलारी या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सेवा मध्ये नेहमीच अग्रेसर आहेत. चिमटा धरण विरोधी कृती समितीमध्ये सक्रिय सहभाग व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आदिलाबाद जिल्ह्यातील बोथ विधानसभाचे निरीक्षक म्हणून आताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या राजकीय ठसा उमटून दिसला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे संघटन व प्रशासन सरचिटणीस म्हणून ते सध्या कार्य करत असून, त्यांचा राज्यभर ओबीसी समाजामध्ये जनसंपर्क दांडगा आहे. धनराज राठोड हे माजी मंत्री मखराम पवार साहेब यांचे जावई असून ते साहेबांचे बहुजनाचे हिताचे विचार व वारसा पुढे घेऊन जात आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ८३ किनवट माहूर विधानसभेमध्ये युवा नेते धनराज राठोड यांना विधानसभेचे उमेदवारी देऊन काँग्रेस पक्षाने नव तरुणांना संधी द्यावी. अशी मागणी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील युवकांना होत आहे. गेली 40 वर्षापासून राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक व विद्यमान आमदार यांनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी कुठलाच मोठा उद्योग या मतदारसंघात आणला नसून फक्त रस्ते नाली यामध्ये टक्केवारी खाण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे या भागातला कुठलाही विकास झाला नसल्यामुळे या भागातून युवा नेते धनराज राठोड यांना संधी देण्यात यावी ही मागणी आता जोर धरू लागली आहे.