भोकर, गंगाधर पडवळे| भोकर विधानसभेतील लोकांना मूर्ख बनवून आज पर्यंत सत्ता लाटण्याचे महापाप येथील राज्यकर्त्यांनी गेली ७७ वर्षांपासून करत आले. त्यांनी फक्त कोपराला गूळ लावला आणि येथील जनतेची दिशाभूल करीत त्यांना विकासच स्वप्न रुपी गूळ चाटायला लावला पण प्रत्येक्षात मात्र विकास फक्त काही मोजक्याच लोकांनाचा करून त्यांचीच घर भरली असा जळजळीत सवाल भोकर येथील त्यांच्या विश्रामगृहातील आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस चे सांभाव्य उमेदवार अरुणभाऊ चव्हाण यांनी केला.
कारण होते राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर प्रथम आयोजित पत्रकार परिषदेचे.भोकर येथे शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी काँग्रेस चे सांभाव्य उमेदवार अरुणभाऊ चव्हाण यांनी भोकर विधानसभा लढविण्याच्या दृष्टीने हाल चाल सुरु केली असून त्यानिमित्त तालुक्यातील पत्रकार यांचा परिचय व पुढील रणनीती यांची माहिती देण्यासाठी त्यात त्यांनी आजावर झालेल्या आमदार यांचा कामाचा पाढा उपस्थिती पत्रकार यांच्या समोर वाचून दाखवला आणि इतक्या वर्षात या भागाचे खासदार, आमदार यांनी देशाचे कॅबिनेट मंत्री म्हणून पहिले.
त्यानंतर राज्याचे राज्यमंत्री आणि दोन वेळा मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री,अशा विविध महत्वाच्या खात्याचे मंत्री असतानाही साधे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी बारमाही पाण्याची व्यवस्था करू शकले नाहीत ना एखादे मोठे उद्योग आपल्या विधानसभा क्षेत्रात अनु शकले नाहीत येथील हजारो बेरोजगार तरुण, तरुणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी इतर ठिकाणी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, हैद्राबाद आदी शहरात जातात त्याचबरोबर दहावी बारावी नंतर येथील गोरगरीब आपल्या पाल्य यांना पुढील शिक्षण देऊ शकत नाही कारण येथे महाविद्यालय यांनी स्थापन केले नाहीत किंवा व्यवसायिक शिक्षण आज पर्यंत येथे आलं नाही.
उदा. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज,आदी. त्याच बरोबर महिला यांना सक्षम बनण्यासाठी ही काम केले पाहिजे. या वरील सर्व विकासावर खूप मोठ काम बाकी आहे म्हणूनच मी परवा माझ्या गोर सेनेच्या कार्यकर्त्यांना विस्वासात घेऊन काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला व ११ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी मला नांदेड येथील कार्यक्रमात पक्ष प्रवेश दिला व तिकिटाचा शब्द दिल्यावरच मी मैदानात उतरलो आहे.असेही नविसरता याप्रसंगी सांगितले. तेंव्हा आता पर्यंत या मतदार संघातील आमदार यांनी जनतेला झुलवत ठेवले कोपराला गूळ लावून चाटायला लावण्याचे काम केले आहे. अशी खोचाक टीका ही यावेळी केली.