हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळेत उपप्राचार्य लक्ष्मण डाके सर यांच्या शुभ हस्ते आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 07 वाजून 55 मिनिटांनी ध्वजारोहण संपन्न झाला. सदरील कार्यक्रम हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा उच्च माध्यमिक विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस दोन दिवसावर येऊन ठेपला असून, हार घर तिरंगा अभियान सर्वत्र राबविला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा उच्च माध्यमिक विद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने काल दिनांक 12 रोजी शहरातून श्री परमेश्वर मंदिरापर्यंत रैली काढून हर घर तिरंगा अभियान राबविण्याचा संदेश देण्यात आला.
त्याचं अनुषंगाने आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी उपप्राचार्य लक्ष्मण डाके सर यांच्या हस्ते सकाळी 07 वाजून 55 मिनिटांनी ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी प्राचार्य रणखांब जी.एम., पर्यवेक्षक खंदारे पी.के., वरिष्ठ महाविद्यालयाचे डॉ. कदम डी. के. , माने , दिलीप माने, जन्नावार मनोज, मुनेश्र्वर भीमराव, यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.