नवीन नांदेड| पशुसंवर्धन हे महत्त्वाचे असुन शेतकरी बांधवांना शेतीच्या पर्याय म्हणून पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय महत्वाचा द्यायला हवे. पशुसंवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित मोहिमेत आपल्या पशुधनांना आणून पशुपालक यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. ते बाभुळगाव येथे आयोजित शिबीर मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग, महाराष्ट्र शासन पशुधनाच्या संवर्धना करीता साजरा करुया ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ दिनांक ०१ ते १५ ऑगस्ट २०२४ पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पशुपालकांना व्हावी, या दृष्टीकोनातून ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथे साजरा करण्यात आला.
यावेळी प्रारंभी नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व शिबीरीचे ऊघ्दाघाटन केले ,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले,सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ.प्रविणकुमार यांच्या सह, डॉ.बोडके भाऊसाहेब, पशुसंवर्धन अधिकारी, डॉ.आठवले, डॉ. अविनाश बुन्नावार पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती नांदेड,खंडागळे, सहायक पशुधन विकास अधिकारी यांच्या सह वैद्यकीय पशुवैद्यकीय
विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्ये स्वागत सरपंच पुंडलिक मस्के, ऊपसरपंच सुंदराबाई राजु मस्के, पार्वती बोडके,काळेशवर मस्के,रेखाताई गिरी, संजय लांडगे,बाळु मल्लूकाबाई पवार, झालाबाई आडे, यांच्या सह ग्रामसेवक रमेश कदम यांनी केले. पशुपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी ‘उच्च उत्पादन व प्रजनन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन’ या पंचसुत्रीचे महत्त्व.केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन योजनांमध्ये सहभागी होण्यास पशुपालकांना प्रवृत्त करणे.
लसीकरण व जंत निर्मूलन पशुधनास लाळ खुरकूत, सांसर्गिक गर्भपात, लम्पी चर्मरोग, घटसर्प, फया, पीपीआर, आंत्रविषार इ. रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणे जंत निर्मूलन करणे. बाह्य परोपजीवी निर्मूलनासाठी औषध फवारणीवंध्यत्व निवारण व पशु आरोग्य शिबीरे गोवंशीय पशुधनातील भाकड काळ कमी करण्यासाठी तपासणी वंध्यत्व निवारण व पशुआरोग्य शिबीर आयोजित करणे.
कृत्रिम रेतन करणे, दूध अनुदान योजना, योजनेचे लाभ सर्व दूध उत्पादकांना मिळण्यामाठी मार्गदर्शन करणे योजना राबवितांना दूध उत्पादकास येणाऱ्या अडचणींचे पशुपालन व्यवसायात सकस बारा पशुखाद्याचे महत्त्व पशुपालकांना पटवून देणे ,चारा उत्पादन तसेच पशुखाद्य निर्मिती योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन चारा स्वयंपूर्ण गाव संकल्पना राबविणे, पशुगणना, पशुगणनेचे महत्व विषद करणे २१ व्या पशुगणनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहिमेत गावातील सर्व पशुपालक यांनी आपली जनावरे तपासणी साठी आणली होती. या शिबिराला माजी सरपंच अशोक मोरे, दता मोरे यांच्या सह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.