नांदेड। जुन्या नांदेड भागात असलेल्या नंदगिरी किल्ला येथे १ ते ४ फेब्रुवारीपर्यंत शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत नंदगिरी नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व किल्ला संवर्धन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.


या पत्रकार परिषदेत किल्लेदार राजेश डाकेवाड,जयेश भरणे,अर्जुन नागेश्वर,प्रवीण देवडे,ओम कदम,सत्यवृत्त सुरावार, प्रसाद पवार, प्रदीप टाक,ऋत्विक नरडेले,किशोरकुमार वागदरीकर,गणेशसिंह परमार,अमोल वागतकर,श्रीनिवास वाघ,बलबिर शेखावत,नरसिंग मुरकुटे,सचिन तेलंगे,आदित्य नागेश्वर,पवन बोंबिलवर,नारायण जाधव,नारायण येमुलवार आदीची उपस्तिती होती.

जुन्या नांदेडातील ऐतिहासिक नंदगिरी किल्ल्याची दुरवस्था झाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी त्यांच्या किल्लेदारास पुनर्जीवन देण्यासाठी प्रयत्न केले असून आताही येथील किल्लेदार नंदगिरी किल्ल्याची जोपासना करीत आहेत. त्यामूळे या किल्ल्याला पुन्हा गत वैभव प्राप्त होत आहे. दरम्यान नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार व नंदगिरी किल्ला संवर्धन समितीच्या वतीने १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत शिवकालीन व पुरातन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार असुन प्रमूख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, सीईओ मीनल करनवाल आयुक डॉ.महेश कुमार डोईफोडे उपस्थित राहणार आहेत.

२ फेब्रुवारीपासून शस्त्रांचे प्रदर्शन सूरू होणार असुन सकाळी १० वाजता माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन प्रमूख पाहुणे म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर, आ. आनंदराव बोंढारकर उपस्थीत राहणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता नंदगिरीच्या बुरुजावरुन हा देशभक्तीपर समूह गीतांचा कार्यक्रम असेल.३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिश उपमहानिरिक्षक शहाजी उमाप तर प्रमूख उपस्थीती आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ. मोहनराव हंबर्डे यांची प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवकालीन व पुरातन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा समारोप होणार नाही. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीएसटी विभागाचे सह आयुक्त तुकाराम गडदे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनेश चव्हाण उपस्थीत राहणार आहेत.