हदगाव, शेख चांदपाशा| कोणत्याही पदावर नसताना कोट्यावधीचा विकास निधी आणून हदगाव -हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचा विकास केला आहे. जे या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी किती विकास केला हे समोरा समोर बसून सांगावं अस चॅलेंज नाव न घेता विद्यमान आमदारांना लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलं.
शिवसेना शिंदे गटातर्फे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव हदगाव येथे कार्यकर्त्याचा मेळावा हायटेक इंग्लिश स्कूल अंबाळा येथे संपन्न झाला. हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील हजारो शिवसेनिक या बैठकीला उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणूक 2024 या निवडणुकीला शिवसेना शिंदे गट यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी झटणारे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवडणूक लढवलीअसा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला.
हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत पराभूत झाले तरी त्यांनी निराश न होता अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकिच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. येत काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गटातून) बाबुराव कदम कोहळीकर हे इच्छुक आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळेल याची ग्यारंटी असल्याने त्यांनी आज दिनांक 6 जुलै रोजी हदगाव येथे कार्यकर्त्याचा एक मेळावा हायटेक इंग्लिश स्कूल येथे घेतला. यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील हजारो शिवसैनिकासह, नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना लोकनेते बाबुराव कदम म्हणाले कि, महाराष्ट्रत भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी महायुतीचे आपल्या पक्षाचे सरकार आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे साहेब असून मी त्यांच्या माध्यमातून हदगाव हिमायतनगर मतदार संघात कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आणला असून, त्यातून विकास कामे सुरु आहेत. नुकतेच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणून सर्वसामान्य महिलांना एक हजार पाचशे रुपये दर महिना देण्याचे ठरविले आहे. ही योजना सर्वसामान्य महिला पर्यंत शिवसैनिकानी पोहोचावी. त्या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये असे सुद्धा लोकनेते बाबुराव कदम यांनी सांगितले.
हदगाव हिमायतनगर मतदार संघासाठी कोणत्याही पदावर नसताना कोट्यावधीचा विकास निधी आणून मतदार संघाचा विकास केला. जे या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना माझे चॅलेंज आहे की, त्यांनी किती विकास केला हे समोरा समोर बसून बोलाव मी खोटं बोलणारा नेता नाही. मी सर्वसामान्यासाठी काम करणारा माणूस आहे. लोकसभा निवडणूक पराभूत झालो लगेच जनतेच्या सेवेसाठी हजर झालो. त्यामुळे पराजयाची भीती बाळगून घरात राहणारा मी नाही. येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करणारा कार्यकर्ता आहे असेही ते म्हणाले.
या मेळाव्याला शिवसेना (शिंदे गट) चे हिमायतनगर तालुकाप्रमुख रामु ठाकरे, हदगांव शिवसेना तालुुका प्रमुख विवेक देशमुख, तसेच हदगाव तालुक्यातील पदाधिकारी, बाबुराव कदम यांचे खंद्दे समर्थक सुदर्शन पाटील, बालाजी राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी लांडगे, माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब कदम, बाबुराव कदम, गोपाल सारडा, पांडुरंग कदम, वळसे पाटील, पि.वाय.जाधव, विद्यानंद जाधव, राजू तावडे, रमेश राठोड, अतुल राऊतराव, रणजित लकडे, आदीसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
बाबुरावजी कदम कोहळीकर बद्दल सर्वसामान्य मध्ये आकर्षण बैठकीच्या निमित्ताने दिसून आलं. हदगाव विधानसभा क्षेत्रातील हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील अतिशय दुर्गम भागातील युवक व नागरिक आवर्जून या बैठकीला दिसून आले.