नांदेड| नांदेड येथील होली सिटी पब्लिक स्कुल पासदगावची इयत्ता ९ वीची शैक्षणिक सहल बेंगरूळू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) येथे संपन्न झाली. दि.३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता बेंगरूळू एक्सप्रेसने विद्यार्थ्यांना सहलीला शुभेच्छा देऊन रवाना करण्यासाठी होली सिटी पब्लिक स्कुलचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक मोहमद अर्शद, बाळासाहेब पवार, सुजाता नाईक मिस, वर्गशिक्षक रिना साले मिस, राजेश जामगे आणि पालक हे उपस्थित होते.


सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी इस्कॉन मंदिर, कर्नाटक विधानसभा भवन, लालबाग बॉटनिकल गार्डन आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांनी विविध माहिती घेऊन इंदिरा गांधी म्युजिकलं फाउंटन पार्क, नम्मा फिश एक्वैरियम प्रदर्शन, बंगरुळू, विशवेश्वर्या इंडस्ट्रियल टेकनॉलॉजिकल म्युझियम बंगरुळू हे भारतातील पहिले एरोस्पेस म्यूझियम आहे. हे म्यूझियम, बेंगळूरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या परिसरात आहे. या म्यूझियममध्ये भारतीय विमान क्षेत्राच्या वाढीचे आणि एचएलच्या विकासाचे दर्शन घेता येते. तसेच लालबाग बॉटनिकल गार्डन आणि वॉटर फॉल मध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला आणि दक्षिण भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला.

बेंगरूळू येथील लालबाग बॉटनिकल गार्डनमधील वनोद्यानातील वनस्पतीं, विविध जातीच्या फुलांची तसेच आधुनिक सिंचन पद्धतीची माहिती मुलांनी मिळवली. सदर सहल दि.७ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाली असून ही सहल यशस्वी होण्यासाठी सहल प्रमुख बाळासाहेब पवार, सुजाता नाईक मिस, कर्मा कंधारे व अर्चना चिंचाळकर यांचे सहकार्य लाभले. सहलीत इयत्ता ९ वी तील ३६ मुले आणि मुली होत्या. अशाप्रकारे सहल खूप आनंददायी वातावरणात संपन्न झाली.
