नांदेड| 24 वे जैन तीश्री भगवान महावीर यांच्या निर्वाण वर्षानिमित्त जिल्हास्तरीय समिती गठीत र्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त राज्य शासनाच्या मंत्री तथा समिती अध्यक्ष मंडलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक 7 ऑगस्टला मंत्रालयात संपन्न झाली.
त्यामध्ये महोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय समितीच्या दिशादर्शकानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यक्रमांचे आयोजन व त्यासंबंधी विविध शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन, जैन संघ यांच्याशी समन्वय करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र 28 ऑगस्ट रोजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशाने काढले आहे.
यामध्ये शिवप्रसाद सुराणा, किशोर पाटणी, आनंद जैन, नवल पोकर्णा, ऋषिकेश कोंडेकर आणि ज्योती जैन या सहा जणांचा समावेश आहे. 24 वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा त्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करणे, त्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नगरपरिषद मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन, जैन संघ यांच्याशी समन्वय साधून कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे अशी जबाबदारी समितीवर देण्यात आली आहे.