नवीन नांदेड l सिडको हडको परिसरात सार्वजनिक ठिकाणी व परिसरातील अनेक भागात साफसफाई होत नसल्याने व नाले सफाई न झाल्याने तुंबलेल्या नाल्या मुळे व दुरंगधी पसरल्याने परिसरातील नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले असुन तात्काळ साफ सफाई करावी अशी मागणी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या कडे निवेदनाद्वारे माजी नगरसेविका ललिता शिंदे यांनी केली आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालय समोरील व आजूबाजूच्या भागात व परिसरात अनेक ठिकाणी,सार्वजानिक भागात मोठ्या प्रमाणात केरकचरा व नाल्या तुंबलेले असल्यामुळे दुरंगधी पसरली आहे,वारंवार संबंधित स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून देऊन ही कचरा उचलत नसल्याने नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अखेर या प्रकरणी सहाय्यक आयुक्त यांच्या कडे निवेदनाद्वारे साफ सफाई व नाल्यातील कचरा काढण्याची मागणी माजी नगरसेविका ललिता बोकारे (शिंदे),विजयाताई गोडघासे,मधुबाला पुरी आणि गुरुमाय यांनी केली आहे.